ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके


ट्रेकिंग, गड, किल्ले, गढ्या व वाडे यांची भटकंती करू इच्छीणाऱ्या किंवा करणाऱ्या भटक्यांसाठी उपयुक्त पुस्तकांची यादी खाली देत आहे. प्रत्येक ट्रेकरकडे किमान हि पुस्तके जरूर असावीत असे मला वाटते. ट्रेकींगला जाण्यापूर्वी पूर्वनियोजनासाठी आणि परिसराचा एक घरचा अभ्यास होण्यासाठी हि पुस्तके खूप उपयुक्त वाटतात.


1) Trek the Sahyadris - Harish Kapadiya - Indus Paperback
2) सांगाती सह्याद्रीचा - Young Zingaro group
3) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे - प्रफुल्लता प्रकाशन
4) आव्हान - आनंद पाळंदे
5) चढाई उतराई - आनंद पाळंदे - उत्कर्ष प्रकाशन
6) गडकोट - भगवान चिले - शिवस्पर्श प्रकाशन
7) अपरिचित गडकोट - भगवान चिले - शिवस्पर्श प्रकाशन
8) दुर्गांच्या देशा - भगवान चिले - शिवस्पर्श प्रकाशन
9) जलदुर्गांच्या साम्राज्यात - भगवान चिले - शिवस्पर्श प्रकाशन
10) दुर्गम दुर्ग - भगवान चिले - शिवस्पर्श प्रकाशन
11) दुर्गसंपदा महाराष्ट्राची - भगवान चिले - शिवस्पर्श प्रकाशन
12) दुर्गवैभव कोल्हापूर जिल्ह्याचे - भगवान चिले - शिवस्पर्श प्रकाशन
13) साप - निलीमकुमार खैरे - जोत्स्ना प्रकाशन
14) सर्पायण - भा. लं. भांबुरकर - कॉन्टिनेन्टल प्रकाशन
15) अथातो दुर्गजिज्ञासा - प्र. के. घाणेकर - स्नेहल प्रकाशन
16) सह्याद्री - स. आ. जोगळेकर
17) रत्नागिरी जिह्याची दुर्गजिज्ञासा - सचिन जोशी - बुकमार्क पब्लिकेशन
18) रायगड जिल्ह्याचे दुर्गवैभव - सचिन जोशी - बुकमार्क पब्लिकेशन
19) नकाशातून दुर्गभ्रमंती - महेंद्र गोवेकर (ट्रेक क्षितिझ संस्था) - स्नेहल प्रकाशन
20) गड-मंदिरावरील द्वारशिल्पे - महेश तेंडुलकर - स्नेहल प्रकाशन
21) गडकिल्ल्यावरील वनस्पती - मंदार दातार - स्नेहल प्रकाशन
22) शिवरायांचे दुर्गविज्ञान व दुर्गव्यवस्थापन - प्र. के. घाणेकर - स्नेहल प्रकाशन
23) साद मराठवाड्यातील किल्ल्यांची - पांडुरंग पाटणकर - स्नेहल प्रकाशन
24) दुर्गभ्रमंती नाशिकची - अमित बोरोले - स्नेहल प्रकाशन
25) दुर्गसंपदा ठाण्याची - सदाशिव टेटविलकर - श्रीकृपा प्रकाशन
26) दुर्गभ्रमणगाथा - गो. नि. दांडेकर - मॅजेस्टिक प्रकाशन
27) महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे (भाग 1 व 2) - सदाशिव स. शिवदे - स्नेहल प्रकाशन

Note : माझ्याकडे या व्यतिरिक्त 50 पेक्षाही अधिक पुस्तके आहेत. मात्र वरील पुस्तकांची यादी फक्त ट्रेकिंग, गड, किल्ले, गढ्या व वाडे यांची भटकंती करू इच्छीणाऱ्या भटक्यांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे सर्व पुस्तकांची नावे इथे दिलेली नाहीत.


वरील पुस्तकाव्यतिरिक्त आडवाटेवरील भटकंतीसाठी घाणेकर सरांचे "सहली एक दिवसाच्या परिसरात पुण्याच्या", आदित्य फडके यांचे "भटकंती साताऱ्याची", आशुतोष बापट यांचे "सफर देखण्या महाराष्ट्राची" व मिलिंद गुणाजी यांची अनेक पुस्तके आहेत. एखाद्या किल्ल्याबद्दल विस्तृत माहिती देणारी अप्पा परब यांची पुस्तके उत्तम आहेत. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांचे "गड किल्ले महाराष्ट्राचे" सर्व किल्ल्यांची जिल्हावार माहिती कळण्यासाठी उपयुक्त.


ट्रेकिंग व इतिहासाशी निगडीत इतर पुस्तकांच्या माहितीसाठी खालील google drive लिंक वरील PDF पहावी.




- विनीत दाते


तळ टीप: हि सर्व पुस्तके विकत घ्यावीत आणि प्रस्तावने सह वेळ काढून नक्की वाचावीत. ट्रेकिंग करताना पाळावयाचे काही उपयुक्त नियम, शिस्त व योग्य सवयी हि पुस्तके वाचून जरूर लागतील अशी आशा बाळगूया.

Comments

  1. साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची - प्र. के. घाणेकर
    चला ट्रेकिंगला - पांडुरंग पाटणकर
    साद चाकाेरीबाहेरील किल्ल्यांची - पांडुरंग पाटणकर

    ReplyDelete
    Replies
    1. संतोषजी, पुस्तकांची नावे दिल्याबद्दल धन्यवाद.
      वरील पुस्तके माझ्याकडे आहेत किंबहुना अजून अनेक पुस्तके आहेत. मी लेखात लिहल्याप्रमाणे अनेक पुस्तके वाचल्यानंतर मी वरील पुस्तकांची यादी काढली जी एक trekker म्हणून प्रत्येक भटक्याकडे कमीतकमी असावीत. शेवटी जेवढी जास्त पुस्तके घ्याल (आणि वाचाल) तेव्हढी जास्त माहिती मिळणार हे निश्चित आहे. परंतु प्रत्येकाला सगळीच पुस्तके विकत घेणे आणि वाचणे शक्य होईलच असे नाही.

      मी हव असेल तर वरील प्रत्येक पुस्तक घेण्यामागील काही कारने देखील देऊ शकतो.

      Delete
  2. मित्रा...
    Google Followers
    .साठी लिंक तयार कर

    ReplyDelete
  3. Vinit date sir... Please tip dya... For
    Beginner

    ReplyDelete
  4. विनीत खूप महत्त्वाची माहिती share केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

    ReplyDelete
  5. Sangati sahiyadeicha mala milu shakel ka? Pdf? Khoop shodhtoy. Sapdatach nahi

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

पावनगड

रांगणा_Rangana