Posts

Showing posts from March, 2017

दुर्गभ्रमंती कोल्हापूराच्या चंदगड परिसराची - भाग १

Image
पूर्वनियोजन, प्रस्थान  आणि वल्लभगडाची भेट  “ट्रेकिंगच भूत आणि सह्याद्रीच वेड, एकदा का कुणाला लागलं कि मग ते स्वस्थ बसू देत नाही”. आता हे कुणी म्हणलंय ते माहित नाही पण ज्याने कुणी म्हणलंय ते अगदी खरं आहे म्हणजे माझ्याबाबतीत तरी अगदीच १००% सत्य. २०१६ च्या सप्टेंबर महिन्यात सायकलवरून पडण्याचे निमित्त झाले आणि गुढग्याला जबर दुखापत झाली. त्यानंतर जवळ जवळ तीन महिने गपगुमान घरातच बसून काढले. जातिवंत भटक्याला हि एक मोठी शिक्षाच. त्यातच डोंगरभटक्यांचा सुर्वणकाळ असणारे सप्टेंबर ते फेब्रुवारी हे सहा महिने किमान यावर्षी तरी ट्रेकिंग शिवायच काढावे लागणार याची खंत  देखील मनात होती. बरोबरच्या इतर सह्यमित्रांचे व्हाट्सएप्प ग्रुपवर रसाळ-सुमार-महीपत, रतनगड-कात्राबाई असे एक से बढकर एक ट्रेक्सचे नियोजन पाहून नुसती जळफळाट होत होती. शेवटी डिसेंबरच्या सुरवातीला या दुखापतीमधून हळू हळू बरा होऊ लागलो आणि डॉक्टरांकडून घराबाहेर पडण्याची मुभा मिळाली. “पुढचे अजून सहा महिने तरी ट्रेक्स करायचे नाहीत”, इति डॉक्टर. पण घरी बसेल तर तो भटक्या कसला. ट्रेकिंग नाही तर नाही मग दुधाची तहान ताकावर भागवावी तसं