Posts

Showing posts from June, 2019

चला सिक्कीम फिरुया - भाग ३

Image
चला सिक्कीम फिरुया - भाग १  -  सिक्कीम राज्याविषयी माहिती, पुर्वतयारी आणि भ्रमंतीचे नियोजन  चला सिक्कीम फिरुया - भाग २  -   प्रस्थान व उत्तर सिक्कीममधील लाचेन व गुरुडोंगमार सरोवरची भटकंती उत्तर सिक्कीमची भटकंती ==> लाचुंग, झिरो पॉईंट, युमथांग व्हॅली व हॉट स्प्रिंग उत्तर सिक्कीममधील नितांत सुंदर लाचुंग गाव (फोटो इंटरनेट साभार) आज मंगळवार, २३ एप्रिल २०१९. आमच्या ट्रिपचा चौथा दिवस. "लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे" या धर्मशास्त्रात सांगितलेल्या नियमाचे आम्ही गेले दोन दिवस अगदी काटेकोरपणे पालन करत होतो. रात्री ९-९.३० वाजताच झोपायचो, त्यामुळे साहजिकच पहाटे ५-५.३० वाजता अलार्म वगैरे न लावताच जाग यायची. आजही प्रत्यक्षात पहाटे ५.३० वाजताचा गजर लावला असताना ५ वाजताच झोप पूर्ण झाल्यामुळे जाग आली. सहज म्हणून खिडकीचे पडदे बाजूला सारले तर बाहेर छान उजाडले होते. लाचुंग गावाला वेढा घातलेले बर्फाच्छादित डोंगर आणि त्यांच्या पडद्याआडून डोकावणारा सूर्यप्रकाश असं खूप सुंदर दृश खिडकीतून दिसत होतं. आजची सकाळ स्वच्छ सूर्यप्रकाश घेऊन उगवली म्हणजे एकूणच आजचा प्रवा

चला सिक्कीम फिरुया - भाग २

Image
चला सिक्कीम फिरुया - भाग १  -  सिक्कीम राज्याविषयी माहिती, पुर्वतयारी आणि भ्रमंतीचे नियोजन    सिक्कीमला प्रस्थान आणि उत्तर सिक्कीमची भटकंती ==> लाचेन व गुरुडोंगमार सरोवर यावर्षीच्या उन्हाळ्यापासून पूर्वांचलातील राज्यांची भटकंती करायची आणि त्याचा श्रीगणेशा सिक्कीम राज्यापासून करायचा यावर जेव्हा आम्हा उभयतांचे शिक्कामोर्तब झाले तसे सहलीच्या तयारीला सुरवात केली. उन्हाळ्याची सुट्टी लागली कि आपण बर्फ बघायला जातोय हे जेव्हा अन्विताला सांगितले तेव्हा तिला तर खूपच आनंद झाला. तिचा आनंद साहजिकच होता म्हणा कारण तिने आत्तापर्यंत बर्फ हा फक्त फ्रीजमधेच पाहिलेला. आम्ही मग जेव्हा तिला तिच्या जन्माआधीचे म्हणजे मार्च २०१२ मधे केलेल्या कश्मीर भटकंतीचे काही फोटो दाखवले तेव्हा कुठे तिचा या गोष्टीवर विश्वास बसला कि बर्फाचे सुद्धा खरे खुरे डोंगर असतात आणि त्यावर आपण चालू आणि खेळू शकतो. झालं, अन्विताला जेव्हा हे समजलं तसं तिने सगळीकडे "आम्ही शाळेला सुट्टी लागल्यावर बर्फ बघायला जाणार" अशी दवंडी पिटवायला सुरवात केली. साहजिकच मग आमच्याच अपार्टमेंटमधे राहणाऱ्या आणखी एका कुटुंबाने आमच्याबरो