Posts

Showing posts from November, 2017

चालुक्यांची प्राचीन राजधानी “कल्याणी”

Image
कर्नाटक, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण सीमेला लागून असणारे एक मोठे राज्य. महाराष्ट्रासारखीच किल्ल्यांची परंपरा या राज्याला देखील लाभली आहे. अगदी आपल्या राज्यासारखे भरमसाठ किल्ले कर्नाटक राज्यात नसले तरी येथे सुद्धा गिरिदुर्ग, वनदुर्ग आणि स्थलदुर्गांची रेलचेल पाहायला मिळते. याच कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात बसवकल्याण नावाचा एक अल्पपरिचित दुर्ग आहे. चला तर मग आज दुर्गसफर करू या थोड्याश्या आडवाटेवरील स्थलदुर्गाची. बसवकल्याण हे महाराष्ट्र-कर्नाटक-हैदराबाद या तीन राज्यांच्या सीमेवर असणारे तालुक्याचे प्रमुख ठिकाण आहे. चालुक्य घराण्याची प्राचीन राजधानी कल्याणी म्हणजेच आजचे बसवकल्याण शहर. चालुक्यानंतर येथे कलचुरी राजवट होती. अकराव्या शतकात बदामीच्या चालुक्यांचा वंशज पहिल्या सोमेश्र्वराने (कल्याणचा चालुक्य) आपली मान्यखेट (मालखेड) ही राजधानी सोडून ‘कल्याणपूर’ किंवा 'कल्याण' येथे राजधानी स्थापन केली. त्याकाळी ऐश्र्वर्य, सपंत्ती व सुबत्ता यांमुळे हे शहर खूप प्रसिद्धीस आले. पण बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात चालुक्यांचा सामंत बिज्जल कलचुरी (११५६-६७) याच्या हाती सर्व सत्