Posts

Showing posts with the label raangna

रांगणा_Rangana

Image
दुर्गम आणि रांगडा “किल्ले रांगणा”! कोल्हापूर हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील एक जिल्हा. पंचगंगेच्या तीरावर वसलेले कोल्हापूर शहर करवीर नगरी म्हणून देखील ओळखले जाते. ही करवीर नगरी जेवढी इतिहासप्रसिद्ध तेवढीच ती प्रसिद्ध येथील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरामुळे. कराकरा वाजणारी कोल्हापुरी चप्पल, बलदंड शरीराच्या पैलवानांची कुस्ती, ठसका आणणारा तिखटजाळ तांबडा-पांढरा रस्सा आणि काळ्या कसदार सुपीक जमिनीत होणारी शेती यामुळे कोल्हापूर जिल्हा जगभर प्रसिद्ध आहे. भटकंतीसाठी उत्तम हवामान असणाऱ्या या जिल्ह्यात गगनबावडा, दाजीपुर, राधानगरी अशी सुंदर पर्यटन स्थळे तर आहेतच पण कोकणाला अगदीच खेटून असल्याने सह्याद्रीच्या ऐन कड्यातील काही इतिहासप्रसिद्ध किल्ले देखील या जिल्ह्यात आहेत. चला तर मग आज दुर्गसफर करू याच कोल्हापूर जिह्यातील एका रांगड्या दुर्गरत्नाची म्हणजेच किल्ले रांगण्याची! मला जर कुणी विचारलं कि कोल्हापूर जिह्यातील सर्वात सुंदर किल्ला कोणता तर माझं झुकत माप नक्कीच असेल ते किल्ले रांगण्याला. “येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल” या ...