Posts

Showing posts from September, 2018

गडभ्रमंती गोमंतकीय किल्ल्यांची - भाग १

Image
माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्या-कपाऱ्यां मधुन घट फ़ुटती दुधाचे||    माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या-फ़णसाची रास फ़ुली फ़ळांचे पाझर फ़ळी फ़ुलांचे सुवास||    माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी,  पाना-फ़ुलांची कुसर पशु-पक्ष्यांच्या किनारी||    माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या रे धारा||    माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा||    माझ्या गोव्याच्या भूमीत चाफ़ा पानाविण फ़ुले भोळा भाबडा शालीन भाव शब्दाविण बोले||    माझ्या गोव्याच्या भूमीत गडे साळीचा रे भात वाढी आईच्या मायेने सोन-केवड्याचा हात||    माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी आतिथ्याची, अगत्याची साऱ्या षडरसांची नांदी||    सर्व महाराष्ट्र ज्यांना 'आनंदयात्री' म्हणून ओळखतो असे कविवर्य बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर) यांची गोव्याचे यथार्थ वर्णन करणारी ही कविता. पण गोवा म्हटलं की आपल्या नजरे समोर काय येत हो? तर तो इथला फेसाळणारा समुद्र, निसर्गरम्य समुद्रकिनारे, काजू,