Posts

Showing posts from October, 2016

Mirgad_मिरगड

Image
नाशिक जिल्हा हा गिरिदुर्गांची खाणच. पण त्या खालोखाल जर कोणत्या जिह्याचा नंबर लागत असेल तर तो रायगड जिह्याचा. हा जिल्हा तर डोंगरी आणि सागरी अशा दोन्ही दुर्गांसाठी प्रसिद्ध. चला तर मग आज याच रायगड जिह्यातील थोड्या आडवाटेवरच्या मिरगड या छोट्या  किल्ल्याची भटकंती करू.  कोंढवी गावातून दिसणारा मिरगड मुंबई-पणजी राष्ट्रीय महामार्गावर असणारे पेण हे गाव शाडूच्या गणेशमूर्तींसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या पेण तालुक्यात सांकशी, रत्नगड आणि मिरगड असे तीन किल्ले येतात. या तीन किल्ल्यांपैकी सांकशीचा किल्ला हा बरीच माहिती उपलब्ध असल्याने पुण्या-मुंबईकडील सर्व ट्रेकर्सना सुपरिचित आहे. मात्र महल मीरा डोंगररांगेत येणारे रत्नगड आणि मिरगड हे किल्ले माहितीच्या अभावामुळे अल्पपरिचित बनले आहेत. त्यामुळे फार कमी म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच ट्रेकर्स या किल्ल्यांना भेट देतात.   झापडी गावातून साधारण एक तास चालून आलो कि आपण पठारावर पोहोचतो आणि समोर मिरगडाचा डोंगर जवळ दिसायला लागतो मिरगडला जाण्यासाठी प्रथम पेण शहर गाठावे. मुंबई-पणजी राष्ट्रीय महामार्गावर पणजीकडे जाताना वडखळ ना

रत्नगड_Ratnagad

Image
रायगड जिल्ह्यातील रत्नगड हा खूप कमी ट्रेकर्सना माहित असणारा किल्ला. गुगलवर रत्नगड असं शोधायला जरी गेलं तरी भंडारदऱ्याचा मुकुटमणी असणाऱ्या रतनगडाचीच भरभरून माहिती मिळते आणि रत्नगडाबद्दल मात्र निराशाच हाती पडते. चला तर मग जाणून घेऊन अशा या अल्पपरिचित रत्नगडाबद्दल. रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यात रत्ना नदीच्या काठी रत्नगड हा छोटासा किल्ला लपला आहे. स्थानिक लोक मात्र याला रतनगड या नावानेच ओळखतात. नगर जिल्ह्यातील प्रवरे काठचा रतनगड पाहण्यासाठी पूर्ण एक दिवस हाताशी हवा मात्र पेण जवळील या छोट्या रतनगडाला भेट देण्यासाठी अर्धा दिवस देखील पुरेसा आहे. कारण समुद्रसपाटी पासून रत्नगडाची उंची १३८० फुट असून पायथ्यापासून हा किल्ला फक्त ६५० फुट उठवला आहे. तसेच या डोंगरावर याला किल्ला म्हणावे असे बुरुज, तटबंदी किंवा दरवाजे असे कोणतेही महत्वाचे अवशेष नाहीत.  रत्नगडाला जाण्यासाठी प्रथम खोपोली गाठावे. खोपोली-पेण रस्त्यावर पेणच्या साधारण ८ किलोमीटर आधी वाक्रूळ नावाचे गाव लागते. वाक्रूळ गावातून डावीकडील एक गाडी रस्ता आधी कामार्ली आणि मग पुढे गड पायथ्याच्या सायमाळ गावाकडे जातो. सायमा

लहुगड_Lahugad

Image
अमेरिका तसेच परदेशात नाताळच्या सणाला फार महत्व आहे. त्यामुळे डिसेंबर एंड म्हणजे आमच्या सारख्या IT वाल्यांना कामातून निवांतपणा मिळणारा महिना. याच सुट्टीचा फायदा घेत २०१४ च्या डिसेंबर महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यातले तब्बल ८ किल्ले पाहीले होते. दोन वर्ष होत आली आता या औरंगाबाद जिह्याच्या भन्नाट ट्रेकला. तेव्हापासूनच मनात होत कि मराठवाड्यातील या किल्ल्यांबद्दल लिहावं आणि त्यातही खास करून फुलंब्री जवळच्या लहुगडाबद्दल सगळ्यात आधी. याच कारणही तसचं आहे मित्रांनो. तुम्ही अगदी “जो सब कूछ जानता है” वाल्या गुगलवर जरी “लहुगड” असा शब्द टाकला तरी तो सुद्धा तुम्हाला लोणावळ्या जवळच्या “अति”प्रसिद्ध लोहगडाचीच माहिती दाखवतो. चला तर मग, थोडक्या माहितीमुळे ऑफबीट वाटणाऱ्या पण अनेक कातळकोरीव अवशेषांनी नटलेल्या लहुगडाची एक भन्नाट सैर करू. लहुगड हा अजिंठा डोंगररांगेला समांतर अश्या अजंठा-वेरूळ लेण्यांच्या डोंगररांगेत येणारा किल्ला आहे. जवळच असणारा देवगिरी सारखा किल्ला आणि प्रसिद्ध अजंठा लेण्यांच्या परिसरातून जाणाऱ्या पुरातन मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला असावा. गडावर असणारे गुहा आणि खांब टाक्

भास्करगड/बसगड_Bhaskargad_Basgad

Image
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपुरीच्या उत्तरेस एक डोंगररांग पसरली आहे ज्याला ‘त्र्यंबक रांग’ म्हणतात. याच त्र्यंबक रांगेत येणारा भास्करगड अथवा बसगड हा हरिहर किल्ल्याचा सख्खा शेजारी. हरिहर किल्ला हा त्याच्या कातळात खोदुन काढलेल्या पायऱ्यासाठी खूप प्रसिद्ध आहे मात्र त्याच्या अगदी जवळ असून देखील भास्करगडाकडे मात्र खूप कमी ट्रेकरचे पाय वळतात.  पायथ्याच्या निरगुडपाडा गावातून दिसणारा बसगड aka भास्करगड. समुद्रसपाटीपासून या किल्ल्यांची उंची अंदाजे ३५०० फूट असून नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकरांगेत हा किल्ला येतो. प्राचीन काळी नालासोपारा, डहाणू, वसई इत्यादी बंदरात येणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गानी देशावर येत असे त्यापैकीच गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी भास्करगडाची निर्मिती झाली. पेशव्यांच्या काळात या किल्ल्याचा तुरुंग म्हणून देखील उपयोग केला गेला. समुद्रसपाटीपासून या किल्ल्यांची उंची अंदाजे ३५०० फूट असून पायथ्याच्या निरगुडपाडा गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी किमान २ तास लागतात. याच निरगुडपाडा गावातून हरिहर (हर्षगडावर) जाणारा मार्ग आहे. त्र्यंबक-घोटी या मार्गावर खोडाळा मार्ग