Posts

Showing posts from September, 2017

खंडाळा घाटातील गंभीरनाथ किंवा नाथबाबाची गुहा

Image
उभ्या महाराष्ट्रभर फिरस्ती करून उत्तमोत्तम पुस्तके लिहणारे जेष्ठ लेखक श्री. प्र. के. घाणेकर यांच्या "सहली एक दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या" या पुस्तकात म्हणल्याप्रमाणे खूप दगदग, त्रास आणि अडचणी यांना सामोरे जात जर का एका दिवसात एक थोडेसे अनगड ठिकाण पहायचे असेल तर एका ठिकाणाची शिफारस करण्याचा मोह आवरत नाही. ते ठिकाण म्हणजे खंडाळा (बोर/भोर) घाटातील गंभीरनाथ किंवा नाथबाबाची गुहा . गंभीरनाथांची गुहा असणारा डोंगर  पुणे-मुंबई हा रेल्वे प्रवास सर्वात सुंदर वाटतो तो म्हणजे लोणावळा ते कर्जत दरम्यान. खास करून पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य भरभरून अनुभवायचे असेल तर हा प्रवास नक्की करावा. लोणावळा स्टेशन मधून रेल्वे सुटली की सगळीकडे हिरवेगार डोंगर, त्यावर उतरलेले ढग आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे धबधबे असे दृश पाहून मन प्रसन्न होते. त्यात हा प्रवास खास गाडीच्या दारात किंवा खिडकीची जागा पकडून करायचा आणि आजूबाजूचे डोंगरदऱ्या, धबधबे डोळयात भरून घ्यायचे. चिंता, काळज्या आणि गाडीतल्या गर्दीने आणलेला वैताग या सगळ्या गोष्टी काही काळापुरत्या विसरायला लावणारी इथली झाडी, श्वास रोखून धरायला लावण