Posts

Showing posts from 2018

गडभ्रमंती गोमंतकीय किल्ल्यांची - भाग २

Image
गडभ्रमंती गोमंतकीय किल्ल्यांची - भाग १ पासून पुढे ...  ब्लॉगच्या पहिल्या भागात गोव्याच्या किल्ल्यांची जी भटकंती आपण केली ते सगळे किल्ले गोव्याच्या अंतरंगात लपलेले होते. म्हणजे हे सर्व किल्ले समुद्रकिनाऱ्यापासून थोडे लांब म्हणजे नदीकाठी किंवा खाडीवर बांधलेले आहेत. पण ब्लॉगच्या या दुसऱ्या भागत आपली सफर घडणार आहे ती गोव्यातील सागरी किल्ल्यांची. चला तर मग करूया सुरवात!   किल्ल्याचे नाव : खोलगड/काबो-द-रामा/Cabo de Rama Fort     तालुका : काणकोण/Canacona/कॅनाकॉना   जिल्हा : दक्षिण गोवा / South Goa   Google Coordinates:  15°5'15"N 73°55'10"E   Google map location: https://goo.gl/maps/ZVrEur5Zhoy एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात आणि अश्या व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक जर का समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. गोव्याच्या काणकोण तालुक्याच्या पश्चिम अंगाला समुद्रामध्ये असेच एक भूशीर घुसलेले आहे ज्याला केप ऑफ रामा म्हणजे रामचे भूशीर असे म्हणतात. गोव्याच्या सौदर्याची भुरळ बहु