Posts

Showing posts from November, 2016

पळशीचा भुईकोट_Palashi Land Fort

Image
लाकडातील नक्षीकामाचा अप्रतिम ठेवा, पळशी येथील होळकरांचे दिवाण पळशीकर यांचा वाडा अहमदनगर म्हणजे सुंदर ऐतिहासिक वाडे व अनेक अप्रतिम गढ्या असणारा जिल्हा. याच नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्‍यात पळशी या गावी होळकरांचे दिवाण रामाजी यादव कांबळे-पळशीकर यांचा भुईकोट किल्ला आहे. या छोट्याशा किल्ले वजा गढीचे खरे वैशिष्ठ म्हणजे भान हरखून जाईल असे लाकडातील नक्षीकाम केलेला पळशीकरांचा वाडा. आपल्या महाराष्ट्रात पळशी नावाची अनेक गावे आहेत. त्यामुळे गुगलच्या नकाशात मात्र हे गाव जरा प्रयत्न पूर्वकच हुडकुन काढावे लागते. पुणे–अहमदनगर रस्त्यावर शिरूर गाव ओलांडले की एक रस्ता डावीकडे अण्णा हजारे यांच्यामुळे प्रसिद्ध असणाऱ्या राळेगणसिद्धीकडे वळतो. या रस्त्यावर आधी पारनेर हे तालुक्याचे गाव गाठायचे. पारनेरनंतर हाच रस्ता पुढे २० किलोमीटर अंतरावर टाकळी येथील ढोकेश्वराच्या लेणीजवळ नगर–कल्याण महामार्गला मिळतो. आता टाकळीजवळ आलाच असाल तर ढोकेश्वराची कोरीव लेणी देखील वाकडी वाट करून आवर्जून पहावीत अशीच. टाळकी येथे नगर–कल्याण महामार्ग सोडायचा की एक छोटा डांबरी रस्ता अनेक वळणे घेत वासुंदे गावामार्गे पळशीत प

रांगणा_Rangana

Image
दुर्गम आणि रांगडा “किल्ले रांगणा”! कोल्हापूर हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील एक जिल्हा. पंचगंगेच्या तीरावर वसलेले कोल्हापूर शहर करवीर नगरी म्हणून देखील ओळखले जाते. ही करवीर नगरी जेवढी इतिहासप्रसिद्ध तेवढीच ती प्रसिद्ध येथील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरामुळे. कराकरा वाजणारी कोल्हापुरी चप्पल, बलदंड शरीराच्या पैलवानांची कुस्ती, ठसका आणणारा तिखटजाळ तांबडा-पांढरा रस्सा आणि काळ्या कसदार सुपीक जमिनीत होणारी शेती यामुळे कोल्हापूर जिल्हा जगभर प्रसिद्ध आहे. भटकंतीसाठी उत्तम हवामान असणाऱ्या या जिल्ह्यात गगनबावडा, दाजीपुर, राधानगरी अशी सुंदर पर्यटन स्थळे तर आहेतच पण कोकणाला अगदीच खेटून असल्याने सह्याद्रीच्या ऐन कड्यातील काही इतिहासप्रसिद्ध किल्ले देखील या जिल्ह्यात आहेत. चला तर मग आज दुर्गसफर करू याच कोल्हापूर जिह्यातील एका रांगड्या दुर्गरत्नाची म्हणजेच किल्ले रांगण्याची! मला जर कुणी विचारलं कि कोल्हापूर जिह्यातील सर्वात सुंदर किल्ला कोणता तर माझं झुकत माप नक्कीच असेल ते किल्ले रांगण्याला. “येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल” या