Posts

Showing posts from January, 2018

सफर कोस्टल कर्नाटकाची - भाग २

Image
सफर कोस्टल कर्नाटकाची - भाग १ पासून पुढे ...  दिवस तिसरा: मंगळवार, २४ ऑक्टोबर २०१७ : =============================== आजच्या दिवसाची सुरवात सकाळी थोडी उशिरानेच झाली. आम्ही उतरलेल्या हॉटेलचेच उत्तम उपहारगृह हॉटेलच्या खालच्या मजल्यावर असल्याने पुन्हा एकदा इडली, उडीदवडा, सांबर यांचा भरपेट नाष्टा झाला आणि त्यानंतरच गाडी मुख्य मंदिराच्या दिशेने वळवली. मुरुडेश्वर मंदिराच्या अगदी समोरच गाडी लावण्यासाठी भव्य पार्किंग (वाहनतळ) उपलब्ध आहे. मुरुडेश्वर येथील सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे येथे असणारी भव्य दिव्य अशी भगवान शंकराची मूर्ती आणि मंदिरासमोर असणारा तब्बल २० मजली उंच गोपूर. ह्या दोन्ही गोष्टी किती तरी लांबून म्हणजे अगदी पनवेल-कन्याकुमारी हायवेवरून सुद्धा सहज दिसतात. मंदिराच्या पार्किंग जवळ पोहोचल्यावर ही मूर्ती आणि गोपूर एवढे भव्य दिसत होते की मान वर करून त्यांच्याकडे पाहताना आता आपली मान मोडते की काय असे वाटायला लागले. या भगवान शंकराच्या मूर्तीला "दोड्डा ईश्वरा" तर गोपूरला "राज गोपुरा" असे म्हणतात. मंदिरासमोर असणारा भव्यदिव्य "राज गोपूर&