Posts

Showing posts from July, 2018

रामदरणे किल्ला

Image
भटकंती रायगड जिल्ह्यातील अल्पपरिचित "रामदरणे" किल्ल्याची!     पावसाळ्यात गडभटकंती आणि तीही गर्दीची ठिकाण टाळून? सध्या किल्ल्यावर होणाऱ्या गर्दीचे (कुंभमेळ्याचे) फोटो पाहून हे थोडं अवघडच काम वाटायला लागलंय. पण बाहेर पडणारा संततधार पाऊस आणि निसर्गाने सगळीकडे पांघरलेली हिरवीगार चादर माझ्यासारख्या भटक्याला घरी बसू देईल तर शपथ. मग शोध सुरु झाला अल्पपरिचित आणि अनवट वाटांचा. पुण्यातून पहाटे निघून जवळपास आणि फक्त एका दिवसाची गडभटकंती करायची असं ठरवल्यावर मग पुणे, सातारा आणि रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या किल्ल्यांच्या नावाची उजळणी सुरु झाली. तसे या तिन्ही जिल्ह्यातले जवळपास सगळे परिचित आणि अल्पपरिचित किल्ले आधीच भटकून झालेले असल्याने किल्ला करायचा तर तो शक्यतो याआधी न बघितलेला करावा असे ठरवल्यामुळे मग घरात असलेली गडकिल्ल्यावरील पुस्तके धुंडाळणे सुरु झाले. शेवटी दुर्गअभ्यासक आणि लेखक श्री. सचिन जोशी यांच्या "रायगड जिल्ह्याचे दुर्गवैभव" ह्या पुस्तकात अलिबाग जवळचा "रामदरणे" नावाचा किल्ला सापडला. आता येथे किल्ला सापडला म्हणजे किल्ला "शोधला" किंवा &quo

सफर कोस्टल कर्नाटकाची - भाग ४

Image
सफर कोस्टल कर्नाटकाची - भाग ३ पासून पुढे ...   दिवस सातवा: शनिवार, २८ ऑक्टोंबर २०१७ ================================   सिरसी हे उत्तर कर्नाटकाच्या हसन जिल्हयातील एक थंड हवेचे ठिकाण. हिरव्यागर्द झाडीने वेढ़लेले हे शहर सुपारीच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. आजुबाजुच्या अनेक गावांतील सुपारी सिरसीमधे विक्रीसाठी येते आणि येथून ती देश-विदेशात देखील पाठवली जाते. त्याचबरोबर कोस्टल कर्नाटक फिरायला येणाऱ्या पर्यटकांचे सिरसी हे एक आवडते शहर. याच कारण म्हणजे या शहराच्या परिसरात पर्यटकांना भटकण्यासाठी याना केव्ह्ज, मरीकाम्बा मंदिर, उंचाल्ली धबधबा, सहस्रलिंग, बनवासी, मुगोड धबधबा, सोंडे मठ, तिबेटीयन मोनेस्ट्री अशी एक ना अनेक सुंदर ठिकाण आहेत. सिरसी शहरात मुक्काम करून दोन दिवसात ही सर्व ठिकाण अगदी निवांतपणे पाहता येतात. आमच्या कोस्टल कर्नाटकाच्या ट्रीपला सुरवात करून बघता बघता ६ दिवस पूर्ण झाले. आता उरलेले दोन दिवस सिरसी गावात राहून आजूबाजूला असणारी प्रसिद्ध पर्यटन स्थळ बघायची आणि रविवारच्या सकाळीच म्हणजे २९ ऑक्टोबरला सांगलीच्या दिशेने परतीचा प्रवास करायचा असा एकूण कार्यक्रम ठरला. आत्त