जामगावचा किल्ला_Jamgaon fort
श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार यांचा भव्य जामगावचा किल्ला/गढी किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ ८६ एकर असून संपूर्ण किल्ल्याच्या बाहेरील तीनही बाजूने तटबंदी आहे तर मागे डोंगराचे नैसर्गिक संरक्षण अहमदनगर जिह्यातील पारनेर तालुक्यामध्ये अनेक सुंदर गढ्या व ऐतिहासिक वाडे आहेत. त्यातीलच एक भुईकोट किल्ला शोभावा असा भव्य वाडा पारनेर पासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या जामगाव येथे आहे. श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार यांचा हा भव्य वाडा प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी नक्कीच पहावा एवढा भव्य आणि अजूनही उत्तम स्थितीत उभा आहे. ह्या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ ८६ एकर असून या संपूर्ण परिसराला वाड्याच्या बाहेरील बाजूने औरस चौरस भलीमोठी तटबंदी बांधलेली आहे. बहुदा पूर्वी जामगाव हे गाव सुद्धा तटबंदीच्या आतच वसलेलं असावं. या अभेद्य तटबंदी मधून बाहेर पडण्यासाठी पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिशांना तीन भलेमोठे दरवाजे आहेत. मारुती मंदिरातील बलभिमाची भव्य आणि अतिशय सुंदर मूर्ती किल्ल्याचा पूर्वाभिमुख मुख्य दरवाजा दरवाज्यावर उभे राहून लांबवर नजर टाकली असता किल्ल्याची दूरवर पसरलेली...