Posts

Showing posts with the label Nashik

भास्करगड/बसगड_Bhaskargad_Basgad

Image
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपुरीच्या उत्तरेस एक डोंगररांग पसरली आहे ज्याला ‘त्र्यंबक रांग’ म्हणतात. याच त्र्यंबक रांगेत येणारा भास्करगड अथवा बसगड हा हरिहर किल्ल्याचा सख्खा शेजारी. हरिहर किल्ला हा त्याच्या कातळात खोदुन काढलेल्या पायऱ्यासाठी खूप प्रसिद्ध आहे मात्र त्याच्या अगदी जवळ असून देखील भास्करगडाकडे मात्र खूप कमी ट्रेकरचे पाय वळतात.  पायथ्याच्या निरगुडपाडा गावातून दिसणारा बसगड aka भास्करगड. समुद्रसपाटीपासून या किल्ल्यांची उंची अंदाजे ३५०० फूट असून नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकरांगेत हा किल्ला येतो. प्राचीन काळी नालासोपारा, डहाणू, वसई इत्यादी बंदरात येणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गानी देशावर येत असे त्यापैकीच गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी भास्करगडाची निर्मिती झाली. पेशव्यांच्या काळात या किल्ल्याचा तुरुंग म्हणून देखील उपयोग केला गेला. समुद्रसपाटीपासून या किल्ल्यांची उंची अंदाजे ३५०० फूट असून पायथ्याच्या निरगुडपाडा गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी किमान २ तास लागतात. याच निरगुडपाडा गावातून हरिहर (हर्षगडावर) जाणारा मार्ग आहे. त्र्यंबक-घोटी या मार्गावर खोडाळा मा...

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

Image
नाशिक पासून २९ किलोमीटर अंतरावर असणारे त्र्यंबकेश्वर हे आद्य तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत वर्षात प्रसिद्ध आहे. याच त्र्यंबकेश्वर गावाच्या पाठीमागे ब्रम्हगिरीचा भला मोठा पर्वत उभा आहे. “दृष्टी पडता ब्रम्हगिरी तया नाही यमपुरी” असे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी ब्रम्हगिरीचे महात्म्य सांगितले. दक्षिण भारतातील पवित्र आणि महत्त्वाची मानली जाणारी गोदावरी नदी याच ब्रम्हगिरी पर्वतावर उगम पावते. पर्वतरूपाने साक्षात शिवाचे वास्तव्य म्हणजे हा ब्रम्हगिरीचा पर्वत. अनेक संत, महर्षी, ऋषी यांनी या पर्वतावर तपस्चर्या केली त्यामुळे या ब्रम्हगिरी पर्वताच्या अनेक पौराणिक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी येणारे अनेक भाविक या पौराणिक महात्म्यामुळे ब्रम्हगिरी पर्वताची पायी प्रदक्षिणा करतात व हा डोंगर चढून जातात.  ब्रम्हगिरी पर्वत मात्र या पौराणिक महात्म्यापुढे ब्रम्हगिरीचे असणारे ऐतिहासिक महत्व थोडे फार डोंगर भटके आणि ट्रेकर सोडल्यास फार कमी लोकांना माहित आहे. इतिहासकाळात श्रीगड तसेच त्र्यंबकगड या नावाने ओळखला जाणारा ब्रम्हगिरी ...

अंजनेरी किल्ला_Anjaneri fort

Image
मारुती, बजरंगबली, बलभीम, केसरीनंदन, आंजनेय, वायुपुत्र, पवनसुत, संकटमोचन अशा एक न अनेक नावांनी ज्याचा आपण उल्लेख करतो अश्या श्रीराम भक्त हनुमानाचे जन्मस्थळ म्हणजे किल्ले अंजनेरी. अंजनेरी गड म्हणजेच रामायणामधील सुप्रसिद्ध ऋष्यमूक पर्वत असेही कुठेतरी वाचण्यात आले. त्यामुळे अंजनेरी किल्ल्याला जसे ऐतिहासिक महत्व आहे तसेच त्याला पौराणिक महत्व देखील आहे. समुद्रसपाटीपासून १३०९ मीटर तर पायथ्यापासून ८०० मीटर उंचीवर असणारा अंजनेरी किल्ला भास्करगडापासून सुरु होणाऱ्या त्र्यंबकरांगेत येतो. नाशिक-त्रंबकेश्वर मार्गावर नाशिक पासून २३ किलोमीटर अंतरावर अंजनेरी गावाचा फाटा आहे. यथे हनुमंताची भली मोठी मूर्ती असलेले एक मंदिर आहे. या मंदिरा शेजारून एक वाट अंजनेरी या छोट्याश्या गावात जाते. गावात हनुमंताचे भक्त असणाऱ्या साधूंचे काही आखाडे व छोटी छोटी अनेक मारुतीची मंदिरे आहेत. अंजनेरी गाव ओलांडून एक कच्चा रस्ता किल्ल्याकडे जातो. किल्ल्याच्या आजूबाजूला दिसणारे पहिने नवरा-नवरी व सासू असे सुळके बघत आपण किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या वनखात्याच्या चौकीपाशी येऊन पोहोचतो. तीन डेरेदार आंब्याच्या झाडाच्य...