Posts

Showing posts from 2020

सोनगड उर्फ नरसिंहगड उर्फ नृसिंहगड

Image
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडवाटेवरील दुर्लक्षित गिरिदुर्ग सोनगड  सिंधुदुर्ग! नैसर्गिक लावण्य आणि उज्ज्वल ऐतिहासिक वारसा असा अनोखा संगम लाभलेला जिल्हा. अथांग पसरलेला निळाशार समुद्रकिनारा, रुपेरी वाळू, हिरवीगार दाट वनराई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देणारा सिंधुदुर्ग किल्ला. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्ह्याचा बहुमान असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणारा शिवलंका सिंधूदुर्ग आपल्या सगळ्यांना परिचयाचा आहे पण त्याचबरोबर या जिल्ह्यात आणखी तब्बल २३ किल्ले आहेत हे फार कमी लोकांना माहिती आहे. या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांची तालुकावार यादी खालील प्रमाणे:  १) तालुका देवगड - विजयदुर्ग, देवगड, सदानंदगड, कोटकामते २) तालुका मालवण - रामगड, भगवंतगड, भरतगड, सिद्धगड, वेताळगड, सर्जेकोट, राजकोट, पद्मगड, सिंधुदुर्ग  ३) तालुका वेंगुर्ला - निवती, यशवंतगड  ४) तालुका कणकवली - खारेपाटण, भैरवगड  ५) तालुका कुडाळ - सोनगड, मनोहरगड, मनसंतोषगड  ६) तालुका सावंतवाडी - नारायणगड, महादेवगड  ७) तालुका दोडामार्ग - हनुमंतगड, बांदा   वरील सर्व किल्ल्यांची वर्गवा

रोहिलागड उर्फ रोहिलगड

Image
जालना जिल्ह्यातील एकमेव गिरिदुर्ग रोहिलागड  डिसेंबर २०१८ साली केलेल्या वऱ्हाडातील (पश्चिम विदर्भ) किल्ल्यांच्या भटकंतीवेळी थोडी वाट वाकडी करून भेट दिलेला मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील हा एकमेव गिरिदुर्ग.  खरंतर विदर्भातल्या किल्ल्यांच्या भटकंतीची सुरवात अकोला जिल्ह्यातील बाळापुरच्या किल्ल्यापासून करायची असे ठरवले होते. पण अगदी पहिल्याच रात्री चिंचवड ते बाळापुर असा ४७० किमीचा सलग १० तासांचा प्रवास जरा कांटाळवाणा झाला असता त्यामुळे मग प्रवासाच्या पहिल्या रात्री औरंगाबाद-जालना हायवेपासून जवळ असणाऱ्या "रोहिलागड" या गावात मुक्काम करायचा आणि सकाळी गावाच्या पाठीमागे असणारा "रोहिलागड" हा किल्ला लगे हात उरकून टाकायचा असे ठरवले. तसाही जालना जिल्ह्यातला हा एकमेव दुर्ग, त्यामुळे तो असाही जाता येताच पदरी पाडून घेणे गरजेचे होते.  रोहिलागड हा खरंतर बरेच ट्रेकर्सना अल्पपरिचित असा किल्ला. कोणत्याही पुस्तकात या किल्ल्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. इंटरनेटवर देखील अलीकडेच ट्रेकक्षितीज या संस्थेच्या वेबसाईटवर या किल्ल्याची थोडीफार माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे मग रोहिलागड क

चला सिक्कीम फिरुया - भाग ५

Image
चला सिक्कीम फिरुया - भाग १ -  सिक्कीम राज्याविषयी माहिती, पुर्वतयारी आणि भ्रमंतीचे नियोजन  चला सिक्कीम फिरुया - भाग २ -  प्रस्थान व उत्तर सिक्कीममधील लाचेन व गुरुडोंगमार सरोवरची भटकंती चला सिक्कीम फिरुया - भाग ३ -  उत्तर सिक्कीममधील लाचुंग, झिरो पॉईंट व युमथांग व्हॅलीची सफर चला सिक्कीम फिरुया - भाग ४  -  गंगटोक शहराचे स्थलदर्शन   पूर्व सिक्कीमची भटकंती ... आज गुरुवार, दिनांक २५ एप्रिल २०१९ . दिवसाची सुरवात थोडी लवकर म्हणजे सकाळी ७ वाजता झाली. आज स्थलदर्शन करत बरेच अंतर प्रवास करायचा होता. आज आम्ही राजधानीचे शहर असणाऱ्या गंगटोकला अलविदा करणार होतो. खरंतर सिक्कीम फिरायला येणारे बहुतांश म्हणजे जवळपास ९०% पर्यटक हे नथुला पास (नाथुला खिंड), त्साम्गो लेक (छांगु सरोवर) आणि बाबा हरभजन सिंग मंदिर ही ठिकाणे पाहून गंगटोकमधेच मुक्कामासाठी परत येतात आणि मग पुढच्या दिवशी गंगटोकवरून एकतर दक्षिण सिक्कीममधील नामची किंवा पश्चिम सिक्कीममधील पेलिंगकडे जातात. आम्ही मात्र या सरळसोट कार्यक्रमाला थोडा छेद देत पूर्व सिक्कीममधेच थोडे आणखी आत घुसायचे आणि काही नवीन ठिकाण पहात आजचा मुक्काम भारत-चीन सीमेला अगदी