Posts

Showing posts from May, 2020

सोनगड उर्फ नरसिंहगड उर्फ नृसिंहगड

Image
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडवाटेवरील दुर्लक्षित गिरिदुर्ग सोनगड  सिंधुदुर्ग! नैसर्गिक लावण्य आणि उज्ज्वल ऐतिहासिक वारसा असा अनोखा संगम लाभलेला जिल्हा. अथांग पसरलेला निळाशार समुद्रकिनारा, रुपेरी वाळू, हिरवीगार दाट वनराई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देणारा सिंधुदुर्ग किल्ला. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्ह्याचा बहुमान असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणारा शिवलंका सिंधूदुर्ग आपल्या सगळ्यांना परिचयाचा आहे पण त्याचबरोबर या जिल्ह्यात आणखी तब्बल २३ किल्ले आहेत हे फार कमी लोकांना माहिती आहे. या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांची तालुकावार यादी खालील प्रमाणे:  १) तालुका देवगड - विजयदुर्ग, देवगड, सदानंदगड, कोटकामते २) तालुका मालवण - रामगड, भगवंतगड, भरतगड, सिद्धगड, वेताळगड, सर्जेकोट, राजकोट, पद्मगड, सिंधुदुर्ग  ३) तालुका वेंगुर्ला - निवती, यशवंतगड  ४) तालुका कणकवली - खारेपाटण, भैरवगड  ५) तालुका कुडाळ - सोनगड, मनोहरगड, मनसंतोषगड  ६) तालुका सावंतवाडी - नारायणगड, महादेवगड  ७) तालुका दोडामार्ग - हनुमंतगड, बांदा   वरील सर्व किल्ल्यांची वर्गवा