Posts

Showing posts with the label कोल्हापूर

पावनगड

Image
दुर्लक्षित एकांडा पावनगड कथा किंवा कांदबरीमधून आपण जुळ्या भावांविषयी विषयी नेहमीच ऐकत असतो तशीच दुर्गविश्वातही काही जुळी भावंडे आढळतात. मग तो नाशिक जिल्यातील रवळ्या-जावळ्या असो, पुणे जिह्यातील लोहगड-विसापूर असो किंवा मग पुरंदर-वज्रगड. या जोड किल्ल्यांप्रमाणेंच कोल्हापूर जिल्ह्यांतील पन्हाळा-पावनगड ही दुर्गजोडी देखील इतिहासात प्रसिद्ध आहे. पन्हाळगड किल्ला माहित नाही असा दुर्गप्रेमी विरळाच. मराठ्यांच्या इतिहासातले अनेक महत्वाचे प्रसंग पन्हाळगडावर घडले त्यामुळे वर्षभर अनेक पर्यटक पन्हाळागडाला भेट देत असतात. मात्र त्याच्या शेजारीच असणाऱ्या पावनगडाला भेट देणाऱ्यांची संख्या अतिशय नगण्य आहे. पावनगड हा पन्हाळा किल्ल्याचाच एक भाग मानला गेल्याने कायम दुर्लक्षित राहिला. मात्र तो पन्हाळा किल्ल्याशेजारी असणारा एक स्वतंत्र जोडकिल्ला आहे. पन्हाळा किल्ला पूर्ण समजून घ्यावयाचा असेल, तर पावनगडाचे महत्त्व फार मोठे आहे. कारण पन्हाळा किल्ल्यावर जेव्हा जेव्हा आक्रमणे झाली तेव्हा त्याचे पहिले वार या पावनगडानेच झेलले आहेत. एप्रिल १७०१ मध्ये औरंगजेबाने पन्हाळा आणि त्याचा उपदुर्ग म्हणजे पावनगड जि...

मुडागड

Image
दाट जंगलात हरवलेला, अल्पपरिचित वनदुर्ग "मुडागड" उन्हाळा हा ट्रेकसाठी सामान्यतः निषिद्ध मानला जातो. याचे एक प्रमुख कारण म्हणजे ट्रेक करताना बसणारा उन्हाचा तडाखा तर दुसर कारण म्हणजे सह्याद्रीच्या कडेकपारीत असणारे आटत जाणारे पाण्याचे स्त्रोत. मग उन्हाळ्यात ट्रेक करायचेच नाहीत का? तर अगदी तसंही काही नाही. खास उन्हाळ्यात करता येतील असे काही ट्रेक आजही पश्‍चिम घाटाच्या समृद्ध वनसंपदेत शिल्लक आहेत ज्यांना वनदुर्ग म्हटले जाते. घनदाट निबीड अरण्यात सह्याद्रीच्या विराट माथ्यावर विराजमान झालेले किल्ले म्हणजे वनदुर्ग. वासोटा, प्रचितगड, भैरवगड (हेळवाक), जंगली जयगड हि अश्याच काही सह्याद्रीमधील सुप्रसिद्ध वनदुर्गांची नावे. काहीश्या अश्याच निबिड अरण्यात लपलेला आणि बहुतेक ट्रेकर्सना नावाने देखील माहित नसलेला एक वनदुर्ग म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यात येणारा "मुडागड". करवीर नगरी कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा, पावनगड, विशाळगड, मुडागड, गगनगड, शिवगड, रांगणा, भुदरगड, सामानगड, गंधर्वगड, कलानिधीगड, महिपालगड, पारगड असे तब्बल १३ किल्ले येतात. यापैकी काही किल्ले त्...

दुर्गभ्रमंती कोल्हापूराच्या चंदगड परिसराची - भाग २

Image
पारगड आणि कलानिधीगडाची  दुर्गभ्रमंती  पारगड किल्ल्यावर पाहिलेला नितांत सुंदर सूर्योदय दुर्गभ्रमंती कोल्हापूराच्या चंदगड परिसराची - भाग १ पासून पुढे ...   सकाळी ६.३० वाजता जाग आली तेव्हा बाहेर मस्त थंडी पडली होती. झोप पूर्ण झाली होती खरी पण थंडीमुळे स्लीपिंग बॅग मधून बाहेर येण्याची अजिबात इच्छा होत न्हवती. बाकीचे अजुनची आपापल्या पांघरुणात गुरफटून गाढ आणि शांत झोपलेले होते. तेवढ्यात टेंट बाहेर कसली तरी खटपट ऐकू आली म्हणून टेंटच्या बाहेर आलो तर मागे गडाच्या तटबंदीवर तीन-चार माकडांची टोळी जणू काही आमच्या उठण्याची वाट पाहत बसलेली. त्यातलच एक माकडाच पिलू चक्क माझ्या टेंटच्या बॅगमधे तोंड खुपसून काहीतर हुडकण्याचा प्रयत्न करत होतं. जवळच ठेवलेली काठी उचलली तशी सगळी माकडं पळून गेली.  पारगड किल्ल्यावर एका सुंदर ठिकाणी केलेले कॅम्पिंग पुर्व क्षितिजावर झोपलेल्या ढगांमागे हळू हळू तांबड फुटायला सुरवात झाली तशी सूर्यनारायण लवकरच आपल्या ड्युटीवर हजर होणार याची वर्दी मिळाली. मग पटापट सकाळची आन्हिक आवरून सगळ्यांना सूर्योदयाची ती सुंदर वेळ अनुभवण्यासाठी उठवल...