विलासगड_Vilasgad
सांगली हा पश्चिम महाराष्ट्रातील एक सधन असा जिल्हा. संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या काठावर होणाऱ्या शेतीमुळे हा प्रदेश खूप हिरवागार बनला आहे. कोकणाच्या सह्याद्रीच्या सीमेला असलेल्या सांगली जिल्ह्यात प्रचितगडासारखा दुर्गम दुर्ग तर आहेच पण त्याचबरोबर मच्छिंद्रगड, विलासगड, बहादूरवाडी, बागणी, गणेशदुर्ग, मिरज, कोळदुर्ग, भूपालगड, जुना पन्हाळा आणि रामदुर्ग असे छोटे भूदुर्ग आणि गिरिदुर्ग देखील आहेत. विलासगड किल्ला आणि त्याच्या मध्यावरचे मल्लिकार्जुनाचे मंदिर पुणे-बंगळूर या राष्ट्रीय महामार्गालगत कराडनंतर पूर्वेकडे विलासगड नावाचा एक दुर्लक्षित किल्ला आहे. पण हा किल्ला डोंगरावरील मल्लिकार्जुन मंदिरामुळे परिसरात मल्लिकार्जुनगड म्हणूनच ओळखला जातो. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असणारा विलासगड समुद्रसपाटीपासून साधारण ८०० मीटर उंचीवर आहे. या किल्ल्यावर किल्ला म्हणून असणारे तटबंदी, बुरुज व दरवाजे असे कोणतेही अवशेष नसले तरीही हा गड पाहण्यासारखा आहे ते त्यावरील एक दोन जुन्या वास्तू व मल्लिकार्जुन मंदिराच्या पुरातन लेण्यांमुळे. गडाकडे जाण्याऱ्या कातळकोरीव पायऱ्या विलासगडाला जाण्यासाठी...