Posts

Showing posts from 2017

सफर कोस्टल कर्नाटकाची - भाग १

Image
भगवान शंकरांचं अधिष्ठान, निसर्गसौंदर्याचं वरदान असलेला, इतिहासाचा वैभवशाली वारसा लाभलेला असा किनारी प्रदेश आणि या प्रदेशातील एक वैभवसंपन्न राज्य म्हणजेच कर्नाटक. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण सीमेला खेटून असणारे हे एक मोठे राज्य. हे राज्य देखील महाराष्ट्रासारखे विविधतेने नटलेले आहे. ऐतिहासिक सांस्कृतिक संपन्नता आणि निसर्ग वैभव येथे आपण अनुभवू शकतो. कर्नाटक राज्याला साधारण २८० किमीचा सागरकिनारा लाभलेला आहे जो महाराष्ट्राला लाभलेल्या किनारपट्टीच्या अर्ध्यापेक्षा ही कमी आहे. कर्नाटकाची हि सागरी किनारपट्टी कोस्टल कर्नाटक म्हणून ओळखली जाते. हि सागरी किनारपट्टी उत्तर कन्नड, उडपी व दक्षिण कन्नड अश्या तीन जिल्ह्यांमधे विभागली गेली आहे. थोडक्यात सांगायचं तर कोस्टल कर्नाटक म्हणजे या तीन जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची सफर. पण ही सफर फार अविस्मरणीय आहे. कारण यात आहेत प्रसिद्ध, प्रेक्षणीय आणि प्राचीन अशी मंदिर, स्वच्छ मुलायम मातीचे समुद्रकिनारे, हिरवीगार घनदाट जंगले, नारळी पोफळी सुपारीच्या बागा आणि या सगळ्यामधून धावणारा लाल मातीचा वळणावळणाचा रस्ता.  गेली दोन वर्ष हि कोस्टल कर्नाटकची ट

चालुक्यांची प्राचीन राजधानी “कल्याणी”

Image
कर्नाटक, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण सीमेला लागून असणारे एक मोठे राज्य. महाराष्ट्रासारखीच किल्ल्यांची परंपरा या राज्याला देखील लाभली आहे. अगदी आपल्या राज्यासारखे भरमसाठ किल्ले कर्नाटक राज्यात नसले तरी येथे सुद्धा गिरिदुर्ग, वनदुर्ग आणि स्थलदुर्गांची रेलचेल पाहायला मिळते. याच कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात बसवकल्याण नावाचा एक अल्पपरिचित दुर्ग आहे. चला तर मग आज दुर्गसफर करू या थोड्याश्या आडवाटेवरील स्थलदुर्गाची. बसवकल्याण हे महाराष्ट्र-कर्नाटक-हैदराबाद या तीन राज्यांच्या सीमेवर असणारे तालुक्याचे प्रमुख ठिकाण आहे. चालुक्य घराण्याची प्राचीन राजधानी कल्याणी म्हणजेच आजचे बसवकल्याण शहर. चालुक्यानंतर येथे कलचुरी राजवट होती. अकराव्या शतकात बदामीच्या चालुक्यांचा वंशज पहिल्या सोमेश्र्वराने (कल्याणचा चालुक्य) आपली मान्यखेट (मालखेड) ही राजधानी सोडून ‘कल्याणपूर’ किंवा 'कल्याण' येथे राजधानी स्थापन केली. त्याकाळी ऐश्र्वर्य, सपंत्ती व सुबत्ता यांमुळे हे शहर खूप प्रसिद्धीस आले. पण बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात चालुक्यांचा सामंत बिज्जल कलचुरी (११५६-६७) याच्या हाती सर्व सत्