Posts

Showing posts with the label रत्नागिरी

भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी - भाग ३

Image
भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी - भाग २ पासून पुढे .... आज जायचे होते रत्नागिरी शहराच्या दक्षिणेकडे म्हणजेच आंबोळगडापर्यंत स्वैर भटकायला. त्यामुळे आजच्या दिवसाची सुरवात देखील मुक्कामी हॉटेलवर भरपूर अल्पोपहार करून सकाळी ९.३० वाजता केली. रत्नागिरी-भाट्ये-पावस-पूर्णगड-कशेळी-आंबोळगड असा सुमारे ६० किलोमीटरचा समुद्रकिनाऱ्याजवळून जाणारा निसर्गरम्य रस्ता आणि या रस्त्यावरील काही निवडक ठिकाणे पहायची असे आजचे टार्गेट ठरवले होते.  आजच्या दिवसाची सुरवात देखील एखाद्या बीचवर छानसा वॉक घेऊन करावी असे ठरवून रत्नागिरी शहरापासून अगदीचं हाकेच्या अंतरावर असणाऱ्या भाट्ये बीचवर पोहोचलो. पण या भाट्येच्या समुद्रकिनाऱ्याने आमची पार निराशा केली. रत्नागिरी शहराच्या अगदीच जवळ असल्याने अनेक होम स्टे, रिसॉर्ट आणि हॉटेल्स यामुळे सदैव गजबजलेला असा हा भाट्ये बीच. साहजिकच आजूबाजूला असणाऱ्या गर्दीमुळे हा बीच बिसलेरीच्या रिकाम्या बाटल्या आणि अस्ताव्यस्त पडलेले प्लास्टिक यांनी भरलेला दिसला. ज्यांना भरपूर खायला मिळणारे आणि वॉटर स्पोर्ट्स सारख्या सुविधा उपलब्ध असणारे गजबजलेले बीच आवडतात त्यांच्यासाठी भाट...

भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी - भाग २

Image
भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी - भाग १ पासून पुढे .... पहिल्याच दिवशी तब्बल ३५० किलोमीटरचा प्रवास झाल्याने आजच्या दिवसाची सुरवात थोडी उशिरानेच झाली. आजच्या दिवसाचे ध्येय होते रत्नागिरी शहराच्या उत्तरेकडे जयगड बंदरापर्यंत ५५ किलोमीटरचा प्रवास करणे आणि या मार्गावरील विविध पर्यटनस्थळे पाहणे. कोकणात ट्रीपला येऊन सुद्धा काल दिवसभरात एकदाही समुद्र न दिसल्याने आमच्या कन्येचाही चांगलाच मूड ऑफ झाला होता. त्यामुळे आज सगळ्यात आधी अन्विताला समुद्र दर्शन घडवायचं आणि तिला मनसोक्त समुद्राच्या मातीत खेळू दयायचं असा ठराव पास झाला. आता आमचं मन देखील अन्विता प्रमाणेच अथांग समुद्र, स्वच्छ वाळूचे किनारे, नारळी-पोफळीच्या बागा, लाल माती, जांभ्या दगडाची टुमदार कौलारू घरं, वळणावळणाचे रस्ते, गर्द झाडी व आमरायांनी सजलेलं कोकण पाहण्यासाठी आसुसलेलं होत. त्यामुळे मुक्कामाच्या हॉटेलमधेच पोटभर नाष्टा करून सकाळी बरोबर ९.३० वाजता हॉटेल सोडलं. रत्नागिरी शहरातून जयगडला जाण्यासाठी रस्त्यांचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक रस्ता म्हणजे रत्नागिरी ==> आरे-वारे ==> नेवरे ==> भांडारपुळे ==> गणपतीपुळे ...