Posts

Showing posts from February, 2017

भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी - भाग ३

Image
भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी - भाग २ पासून पुढे .... आज जायचे होते रत्नागिरी शहराच्या दक्षिणेकडे म्हणजेच आंबोळगडापर्यंत स्वैर भटकायला. त्यामुळे आजच्या दिवसाची सुरवात देखील मुक्कामी हॉटेलवर भरपूर अल्पोपहार करून सकाळी ९.३० वाजता केली. रत्नागिरी-भाट्ये-पावस-पूर्णगड-कशेळी-आंबोळगड असा सुमारे ६० किलोमीटरचा समुद्रकिनाऱ्याजवळून जाणारा निसर्गरम्य रस्ता आणि या रस्त्यावरील काही निवडक ठिकाणे पहायची असे आजचे टार्गेट ठरवले होते.  आजच्या दिवसाची सुरवात देखील एखाद्या बीचवर छानसा वॉक घेऊन करावी असे ठरवून रत्नागिरी शहरापासून अगदीचं हाकेच्या अंतरावर असणाऱ्या भाट्ये बीचवर पोहोचलो. पण या भाट्येच्या समुद्रकिनाऱ्याने आमची पार निराशा केली. रत्नागिरी शहराच्या अगदीच जवळ असल्याने अनेक होम स्टे, रिसॉर्ट आणि हॉटेल्स यामुळे सदैव गजबजलेला असा हा भाट्ये बीच. साहजिकच आजूबाजूला असणाऱ्या गर्दीमुळे हा बीच बिसलेरीच्या रिकाम्या बाटल्या आणि अस्ताव्यस्त पडलेले प्लास्टिक यांनी भरलेला दिसला. ज्यांना भरपूर खायला मिळणारे आणि वॉटर स्पोर्ट्स सारख्या सुविधा उपलब्ध असणारे गजबजलेले बीच आवडतात त्यांच्यासाठी भाट्ये