Posts

Showing posts from July, 2017

भुषणगड

Image
खटावचे भुषण “भुषणगड” साताऱ्या जिल्ह्यात दुर्गभ्रमंतीला निघालो की कायम एक प्रश्न डोक्यात घोळत असतो तो म्हणजे सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग अति पावसाळी तर पूर्व भागात अवर्षण परिस्थिती. असे का असेल बरे? म्हणजे बघा, साताऱ्याच्या पश्चिमेला असणाऱ्या महाबळेश्वर, वाई, जावळी या तालुक्यात पावसाळ्यात वार्षिक सरासरी ६२५ सेंटीमीटर इतका भयंकर पाऊस पडतो तर तेच पूर्वेकडे असणाऱ्या खटाव, माण, कोरेगाव, फलटण अश्या तालुक्यात फक्त ६० सेंटीमीटर इतका कमी पाऊस पडतो. आता याचं कारण शोधायला गेलं तर लक्षात येईल की सातारा जिल्ह्याच्या पूर्वेला खूपच भकास उघडा-बोडका प्रदेश आहे ज्यावर डोंगरांच्या अगदीच तुरळक अश्या काही रांगा पसरलेल्या दिसतात. साहजिकच यामुळे येथे पावसाचे प्रमाण कमी असते. सातारा जिल्ह्याच्या या भागातील अशीच एक डोंगररांग म्हणजे महादेव डोंगररांग किंवा शंभू महादेवाचे डोंगर. या महादेवरांगेच्या उत्तरेस नीरा नदीचे, तर दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे पसरलेले आहे. हि डोंगररांग सलगपणे पसरलेली नाही तर अनेक ठिकाणी खंडित झालेल्या स्वरुपात आहे. त्यामुळेच निरनिराळ्या भागांत ही डोंगरारांग वेगवेगळ्या नावांनी परिचित