Posts

Showing posts with the label उत्तर सिक्कीम

चला सिक्कीम फिरुया - भाग २

Image
चला सिक्कीम फिरुया - भाग १  -  सिक्कीम राज्याविषयी माहिती, पुर्वतयारी आणि भ्रमंतीचे नियोजन    सिक्कीमला प्रस्थान आणि उत्तर सिक्कीमची भटकंती ==> लाचेन व गुरुडोंगमार सरोवर यावर्षीच्या उन्हाळ्यापासून पूर्वांचलातील राज्यांची भटकंती करायची आणि त्याचा श्रीगणेशा सिक्कीम राज्यापासून करायचा यावर जेव्हा आम्हा उभयतांचे शिक्कामोर्तब झाले तसे सहलीच्या तयारीला सुरवात केली. उन्हाळ्याची सुट्टी लागली कि आपण बर्फ बघायला जातोय हे जेव्हा अन्विताला सांगितले तेव्हा तिला तर खूपच आनंद झाला. तिचा आनंद साहजिकच होता म्हणा कारण तिने आत्तापर्यंत बर्फ हा फक्त फ्रीजमधेच पाहिलेला. आम्ही मग जेव्हा तिला तिच्या जन्माआधीचे म्हणजे मार्च २०१२ मधे केलेल्या कश्मीर भटकंतीचे काही फोटो दाखवले तेव्हा कुठे तिचा या गोष्टीवर विश्वास बसला कि बर्फाचे सुद्धा खरे खुरे डोंगर असतात आणि त्यावर आपण चालू आणि खेळू शकतो. झालं, अन्विताला जेव्हा हे समजलं तसं तिने सगळीकडे "आम्ही शाळेला सुट्टी लागल्यावर बर्फ बघायला जाणार" अशी दवंडी पिटवायला सुरवात केली. साहजिकच मग आमच्याच अपार्टमेंटमधे राहणाऱ्या आणखी एका कुटुंबाने ...