Posts

Showing posts from May, 2017

मुडागड

Image
दाट जंगलात हरवलेला, अल्पपरिचित वनदुर्ग "मुडागड" उन्हाळा हा ट्रेकसाठी सामान्यतः निषिद्ध मानला जातो. याचे एक प्रमुख कारण म्हणजे ट्रेक करताना बसणारा उन्हाचा तडाखा तर दुसर कारण म्हणजे सह्याद्रीच्या कडेकपारीत असणारे आटत जाणारे पाण्याचे स्त्रोत. मग उन्हाळ्यात ट्रेक करायचेच नाहीत का? तर अगदी तसंही काही नाही. खास उन्हाळ्यात करता येतील असे काही ट्रेक आजही पश्‍चिम घाटाच्या समृद्ध वनसंपदेत शिल्लक आहेत ज्यांना वनदुर्ग म्हटले जाते. घनदाट निबीड अरण्यात सह्याद्रीच्या विराट माथ्यावर विराजमान झालेले किल्ले म्हणजे वनदुर्ग. वासोटा, प्रचितगड, भैरवगड (हेळवाक), जंगली जयगड हि अश्याच काही सह्याद्रीमधील सुप्रसिद्ध वनदुर्गांची नावे. काहीश्या अश्याच निबिड अरण्यात लपलेला आणि बहुतेक ट्रेकर्सना नावाने देखील माहित नसलेला एक वनदुर्ग म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यात येणारा "मुडागड". करवीर नगरी कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा, पावनगड, विशाळगड, मुडागड, गगनगड, शिवगड, रांगणा, भुदरगड, सामानगड, गंधर्वगड, कलानिधीगड, महिपालगड, पारगड असे तब्बल १३ किल्ले येतात. यापैकी काही किल्ले त्

दुर्गभ्रमंती कोल्हापूराच्या चंदगड परिसराची - भाग २

Image
पारगड आणि कलानिधीगडाची  दुर्गभ्रमंती  पारगड किल्ल्यावर पाहिलेला नितांत सुंदर सूर्योदय दुर्गभ्रमंती कोल्हापूराच्या चंदगड परिसराची - भाग १ पासून पुढे ...   सकाळी ६.३० वाजता जाग आली तेव्हा बाहेर मस्त थंडी पडली होती. झोप पूर्ण झाली होती खरी पण थंडीमुळे स्लीपिंग बॅग मधून बाहेर येण्याची अजिबात इच्छा होत न्हवती. बाकीचे अजुनची आपापल्या पांघरुणात गुरफटून गाढ आणि शांत झोपलेले होते. तेवढ्यात टेंट बाहेर कसली तरी खटपट ऐकू आली म्हणून टेंटच्या बाहेर आलो तर मागे गडाच्या तटबंदीवर तीन-चार माकडांची टोळी जणू काही आमच्या उठण्याची वाट पाहत बसलेली. त्यातलच एक माकडाच पिलू चक्क माझ्या टेंटच्या बॅगमधे तोंड खुपसून काहीतर हुडकण्याचा प्रयत्न करत होतं. जवळच ठेवलेली काठी उचलली तशी सगळी माकडं पळून गेली.  पारगड किल्ल्यावर एका सुंदर ठिकाणी केलेले कॅम्पिंग पुर्व क्षितिजावर झोपलेल्या ढगांमागे हळू हळू तांबड फुटायला सुरवात झाली तशी सूर्यनारायण लवकरच आपल्या ड्युटीवर हजर होणार याची वर्दी मिळाली. मग पटापट सकाळची आन्हिक आवरून सगळ्यांना सूर्योदयाची ती सुंदर वेळ अनुभवण्यासाठी उठवलं. सूर्योदय एखाद्या डोंग