Posts

Showing posts with the label नगर

पळशीचा भुईकोट_Palashi Land Fort

Image
लाकडातील नक्षीकामाचा अप्रतिम ठेवा, पळशी येथील होळकरांचे दिवाण पळशीकर यांचा वाडा अहमदनगर म्हणजे सुंदर ऐतिहासिक वाडे व अनेक अप्रतिम गढ्या असणारा जिल्हा. याच नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्‍यात पळशी या गावी होळकरांचे दिवाण रामाजी यादव कांबळे-पळशीकर यांचा भुईकोट किल्ला आहे. या छोट्याशा किल्ले वजा गढीचे खरे वैशिष्ठ म्हणजे भान हरखून जाईल असे लाकडातील नक्षीकाम केलेला पळशीकरांचा वाडा. आपल्या महाराष्ट्रात पळशी नावाची अनेक गावे आहेत. त्यामुळे गुगलच्या नकाशात मात्र हे गाव जरा प्रयत्न पूर्वकच हुडकुन काढावे लागते. पुणे–अहमदनगर रस्त्यावर शिरूर गाव ओलांडले की एक रस्ता डावीकडे अण्णा हजारे यांच्यामुळे प्रसिद्ध असणाऱ्या राळेगणसिद्धीकडे वळतो. या रस्त्यावर आधी पारनेर हे तालुक्याचे गाव गाठायचे. पारनेरनंतर हाच रस्ता पुढे २० किलोमीटर अंतरावर टाकळी येथील ढोकेश्वराच्या लेणीजवळ नगर–कल्याण महामार्गला मिळतो. आता टाकळीजवळ आलाच असाल तर ढोकेश्वराची कोरीव लेणी देखील वाकडी वाट करून आवर्जून पहावीत अशीच. टाळकी येथे नगर–कल्याण महामार्ग सोडायचा की एक छोटा डांबरी रस्ता अनेक वळणे घेत वासुंदे गावामार्गे पळशीत प...

जामगावचा किल्ला_Jamgaon fort

Image
श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार यांचा भव्य जामगावचा किल्ला/गढी किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ ८६ एकर असून संपूर्ण किल्ल्याच्या बाहेरील तीनही बाजूने तटबंदी आहे तर मागे डोंगराचे नैसर्गिक संरक्षण अहमदनगर जिह्यातील पारनेर तालुक्यामध्ये अनेक सुंदर गढ्या व ऐतिहासिक वाडे आहेत. त्यातीलच एक भुईकोट किल्ला शोभावा असा भव्य वाडा पारनेर पासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या जामगाव येथे आहे. श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार यांचा हा भव्य वाडा प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी नक्कीच पहावा एवढा भव्य आणि अजूनही उत्तम स्थितीत उभा आहे. ह्या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ ८६ एकर असून या संपूर्ण परिसराला वाड्याच्या बाहेरील बाजूने औरस चौरस भलीमोठी तटबंदी बांधलेली आहे. बहुदा पूर्वी जामगाव हे गाव सुद्धा तटबंदीच्या आतच वसलेलं असावं. या अभेद्य तटबंदी मधून बाहेर पडण्यासाठी पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिशांना तीन भलेमोठे दरवाजे आहेत.   मारुती मंदिरातील बलभिमाची भव्य आणि अतिशय सुंदर मूर्ती  किल्ल्याचा पूर्वाभिमुख मुख्य दरवाजा दरवाज्यावर उभे राहून लांबवर नजर टाकली असता किल्ल्याची दूरवर पसरलेली...