Posts

Showing posts with the label Coastal Karnataka

सफर कोस्टल कर्नाटकाची - भाग ४

Image
सफर कोस्टल कर्नाटकाची - भाग ३ पासून पुढे ...   दिवस सातवा: शनिवार, २८ ऑक्टोंबर २०१७ ================================   सिरसी हे उत्तर कर्नाटकाच्या हसन जिल्हयातील एक थंड हवेचे ठिकाण. हिरव्यागर्द झाडीने वेढ़लेले हे शहर सुपारीच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. आजुबाजुच्या अनेक गावांतील सुपारी सिरसीमधे विक्रीसाठी येते आणि येथून ती देश-विदेशात देखील पाठवली जाते. त्याचबरोबर कोस्टल कर्नाटक फिरायला येणाऱ्या पर्यटकांचे सिरसी हे एक आवडते शहर. याच कारण म्हणजे या शहराच्या परिसरात पर्यटकांना भटकण्यासाठी याना केव्ह्ज, मरीकाम्बा मंदिर, उंचाल्ली धबधबा, सहस्रलिंग, बनवासी, मुगोड धबधबा, सोंडे मठ, तिबेटीयन मोनेस्ट्री अशी एक ना अनेक सुंदर ठिकाण आहेत. सिरसी शहरात मुक्काम करून दोन दिवसात ही सर्व ठिकाण अगदी निवांतपणे पाहता येतात. आमच्या कोस्टल कर्नाटकाच्या ट्रीपला सुरवात करून बघता बघता ६ दिवस पूर्ण झाले. आता उरलेले दोन दिवस सिरसी गावात राहून आजूबाजूला असणारी प्रसिद्ध पर्यटन स्थळ बघायची आणि रविवारच्या सकाळीच म्हणजे २९ ऑक्टोबरला सांगलीच्या दिशेने परतीचा प्रवास करायचा असा एकूण कार्यक्रम ठ...