Posts

Showing posts with the label Sikkim

चला सिक्कीम फिरुया - भाग ५

Image
चला सिक्कीम फिरुया - भाग १ -  सिक्कीम राज्याविषयी माहिती, पुर्वतयारी आणि भ्रमंतीचे नियोजन  चला सिक्कीम फिरुया - भाग २ -  प्रस्थान व उत्तर सिक्कीममधील लाचेन व गुरुडोंगमार सरोवरची भटकंती चला सिक्कीम फिरुया - भाग ३ -  उत्तर सिक्कीममधील लाचुंग, झिरो पॉईंट व युमथांग व्हॅलीची सफर चला सिक्कीम फिरुया - भाग ४  -  गंगटोक शहराचे स्थलदर्शन   पूर्व सिक्कीमची भटकंती ... आज गुरुवार, दिनांक २५ एप्रिल २०१९ . दिवसाची सुरवात थोडी लवकर म्हणजे सकाळी ७ वाजता झाली. आज स्थलदर्शन करत बरेच अंतर प्रवास करायचा होता. आज आम्ही राजधानीचे शहर असणाऱ्या गंगटोकला अलविदा करणार होतो. खरंतर सिक्कीम फिरायला येणारे बहुतांश म्हणजे जवळपास ९०% पर्यटक हे नथुला पास (नाथुला खिंड), त्साम्गो लेक (छांगु सरोवर) आणि बाबा हरभजन सिंग मंदिर ही ठिकाणे पाहून गंगटोकमधेच मुक्कामासाठी परत येतात आणि मग पुढच्या दिवशी गंगटोकवरून एकतर दक्षिण सिक्कीममधील नामची किंवा पश्चिम सिक्कीममधील पेलिंगकडे जातात. आम्ही मात्र या सरळसोट कार्यक्रमाला थोडा छेद देत पूर्व सिक्कीममधेच थोडे आणखी आत घुसायचे आणि काही नवीन ठिकाण...

चला सिक्कीम फिरुया - भाग ४

Image
चला सिक्कीम फिरुया - भाग १  -  सिक्कीम राज्याविषयी माहिती, पुर्वतयारी आणि भ्रमंतीचे नियोजन  चला सिक्कीम फिरुया - भाग २  -   प्रस्थान व उत्तर सिक्कीममधील लाचेन व गुरुडोंगमार सरोवरची भटकंती चला सिक्कीम फिरुया - भाग ३  -  उत्तर सिक्कीममधील लाचुंग, झिरो पॉईंट व युमथांग व्हॅलीची सफर गंगटोक शहराचे स्थलदर्शन ... आज बुधवार, २४ एप्रिल २०१९.  आज सर्वजण बरेच रिलॅक्स होतो. याच कारण म्हणजे आजचा दिवस हा खास फक्त गंगटोक शहराच्या भटकंतीसाठी राखीव ठेवलेला होता. त्यामुळे आज फारसा प्रवास करायचा नव्हता. गंगटोक हे भारतातलं सर्वात स्वच्छ हिलस्टेशन म्हणून ओळखलं जातं. सिक्कीमची राजधानी असणारं हे शहर समुद्रसपाटीपासून तब्बल ५५०० फुटांवर वसलेलं एक फारच सुंदर ठिकाण आहे. स्थानिक लोक या शहराचा उच्चार गान्तोक किंवा गँटोक असा करतात. गँटोक म्हणजे डोंगराचं टोक किंवा डोंगरमाथा होय. गंगटोक हा शहरी भाग असला तरी पूर्ण डोंगरउतारावर वसलेलं हे शहर आहे. त्यामुळे इथं कुठेही जायचं झालं तरी अरुंद आणि वळणावळणाचा घाटरस्ता किंवा पायी जायचं झालं तरी पायऱ्या या ठरलेल्याच. उंच पर्वत...