Posts

Showing posts from June, 2017

पावनगड

Image
दुर्लक्षित एकांडा पावनगड कथा किंवा कांदबरीमधून आपण जुळ्या भावांविषयी विषयी नेहमीच ऐकत असतो तशीच दुर्गविश्वातही काही जुळी भावंडे आढळतात. मग तो नाशिक जिल्यातील रवळ्या-जावळ्या असो, पुणे जिह्यातील लोहगड-विसापूर असो किंवा मग पुरंदर-वज्रगड. या जोड किल्ल्यांप्रमाणेंच कोल्हापूर जिल्ह्यांतील पन्हाळा-पावनगड ही दुर्गजोडी देखील इतिहासात प्रसिद्ध आहे. पन्हाळगड किल्ला माहित नाही असा दुर्गप्रेमी विरळाच. मराठ्यांच्या इतिहासातले अनेक महत्वाचे प्रसंग पन्हाळगडावर घडले त्यामुळे वर्षभर अनेक पर्यटक पन्हाळागडाला भेट देत असतात. मात्र त्याच्या शेजारीच असणाऱ्या पावनगडाला भेट देणाऱ्यांची संख्या अतिशय नगण्य आहे. पावनगड हा पन्हाळा किल्ल्याचाच एक भाग मानला गेल्याने कायम दुर्लक्षित राहिला. मात्र तो पन्हाळा किल्ल्याशेजारी असणारा एक स्वतंत्र जोडकिल्ला आहे. पन्हाळा किल्ला पूर्ण समजून घ्यावयाचा असेल, तर पावनगडाचे महत्त्व फार मोठे आहे. कारण पन्हाळा किल्ल्यावर जेव्हा जेव्हा आक्रमणे झाली तेव्हा त्याचे पहिले वार या पावनगडानेच झेलले आहेत. एप्रिल १७०१ मध्ये औरंगजेबाने पन्हाळा आणि त्याचा उपदुर्ग म्हणजे पावनगड जि