Posts

Showing posts from 2016

भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी - भाग १

Image
गुढघ्याला झालेल्या दुखापतीमुळे जवळ जवळ अडीच महिने घरीच बसून काढले. सक्तीची विश्रांती होती खरी पण माझ्यासारख्या भटक्याला एवढा काळ घरी बसून काढायचा म्हणजे एक भयंकर शिक्षा सुनावल्यासारखं वाटत होत. अजून पुढचे ३/४ महिने तरी ट्रेकिंग किंवा सायकलिंग सारख्या जास्त स्ट्रेस देणाऱ्या गोष्टी करता येणार नसल्याने कुठतरी कौटुंबिक भटकंती तरी करून यावी असं सारखं मनात होत. त्यातच डॉक्टरांकडून कार चालवण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याने सौं बरोबर चर्चा करून अखेरीस कोकणात भटकंतीला जाण्यावर शिक्कामोर्तब झाले. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा तसा कोकणात भटकंतीला जाण्याचा एक सर्वोत्तम काळ. त्यानुसार ९ ते १२ डिसेंबर २०१६ असे सुट्ट्या पाहून चार दिवस मोकळे काढले. ठरलं असं की रत्नागिरी शहरातल्या एखाद्या बऱ्यापैकी हॉटेलमधे राहायच आणि एकेक दिवस रत्नागिरी शहराच्या उत्तर आणि दक्षिण बाजूकडील ५० किलोमीटरचा परिसर भटकायचा. त्यानुसार या चार दिवसात कोणकोणती मंदिर, समुद्र किनारे आणि अनवट ठिकाण पाहता येतील याचा शोध सुरु झाला. त्याप्रमाणे चार दिवसात जी ठिकाण पहिली ती अशी दिवस पहिला: पुणे ते रत्नागिरी माजगावचा प्रताप मारुती

भुदरगड_Bhudargad

Image
शिलाहारांच्या विविध शाखांपैकी कोल्हापूरचे शिलाहार घराणे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचे घराणे मानले जाते. या घराण्याने इसवी सन ९४० ते १२१२ या काळात राज्य केले. या घराण्यात एकूण १६ राजे सिंहासनावर बसले त्यामधील शेवटचा राजा भोज (दुसरा) हा होता. त्याने ११७५ ते १२१२ या काळात राज्य केले आणि जवळ जवळ १५ किल्ले बांधले. सध्याच्या पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा जिल्हयातील पन्हाळगड, विशाळगड, गगनगड, रांगणा, अजिंक्यतारा असे अनेक महत्वाचे किल्ले बांधण्याचे श्रेय या राजाकडेच जाते. चला तर मग, आज दुर्गभ्रमंती करू याच शिलाहार वंशीय महामंडलेश्वर राजा भोज (दुसरा) याने बांधलेल्या भुदरगड या किल्ल्याची. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यात त्याच नावाचा हा किल्ला आहे. खर तर भुदरगड किल्ल्याचेच नाव या तालुक्याला दिले आहे असे म्हणावे लागेल. कारण भुदरगड नावाचे कोणतेही गाव या तालुक्यात नाही. गारगोटी हे या तालुक्याचे मुख्य ठिकाण असून सर्व प्रशासकीय कामे गारगोटी शहरातूनच चालतात. गारगोटी पासून फक्त १० किलोमीटर अंतरावर भुदरगड किल्ला आहे. महाराष्ट्रातील निवडक क