Mirgad_मिरगड
नाशिक जिल्हा हा गिरिदुर्गांची खाणच. पण त्या खालोखाल जर कोणत्या जिह्याचा नंबर लागत असेल तर तो रायगड जिह्याचा. हा जिल्हा तर डोंगरी आणि सागरी अशा दोन्ही दुर्गांसाठी प्रसिद्ध. चला तर मग आज याच रायगड जिह्यातील थोड्या आडवाटेवरच्या मिरगड या छोट्या किल्ल्याची भटकंती करू. कोंढवी गावातून दिसणारा मिरगड मुंबई-पणजी राष्ट्रीय महामार्गावर असणारे पेण हे गाव शाडूच्या गणेशमूर्तींसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या पेण तालुक्यात सांकशी, रत्नगड आणि मिरगड असे तीन किल्ले येतात. या तीन किल्ल्यांपैकी सांकशीचा किल्ला हा बरीच माहिती उपलब्ध असल्याने पुण्या-मुंबईकडील सर्व ट्रेकर्सना सुपरिचित आहे. मात्र महल मीरा डोंगररांगेत येणारे रत्नगड आणि मिरगड हे किल्ले माहितीच्या अभावामुळे अल्पपरिचित बनले आहेत. त्यामुळे फार कमी म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच ट्रेकर्स या किल्ल्यांना भेट देतात. झापडी गावातून साधारण एक तास चालून आलो कि आपण पठारावर पोहोचतो आणि समोर मिरगडाचा डोंगर जवळ दिसायला लागतो मिरगडला जाण्यासाठी प्रथम पेण शहर गाठावे. मुंबई-पणजी राष्ट्रीय महामार्गावर पणजीकडे ...