Posts

भुषणगड

Image
खटावचे भुषण “भुषणगड” साताऱ्या जिल्ह्यात दुर्गभ्रमंतीला निघालो की कायम एक प्रश्न डोक्यात घोळत असतो तो म्हणजे सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग अति पावसाळी तर पूर्व भागात अवर्षण परिस्थिती. असे का असेल बरे? म्हणजे बघा, साताऱ्याच्या पश्चिमेला असणाऱ्या महाबळेश्वर, वाई, जावळी या तालुक्यात पावसाळ्यात वार्षिक सरासरी ६२५ सेंटीमीटर इतका भयंकर पाऊस पडतो तर तेच पूर्वेकडे असणाऱ्या खटाव, माण, कोरेगाव, फलटण अश्या तालुक्यात फक्त ६० सेंटीमीटर इतका कमी पाऊस पडतो. आता याचं कारण शोधायला गेलं तर लक्षात येईल की सातारा जिल्ह्याच्या पूर्वेला खूपच भकास उघडा-बोडका प्रदेश आहे ज्यावर डोंगरांच्या अगदीच तुरळक अश्या काही रांगा पसरलेल्या दिसतात. साहजिकच यामुळे येथे पावसाचे प्रमाण कमी असते. सातारा जिल्ह्याच्या या भागातील अशीच एक डोंगररांग म्हणजे महादेव डोंगररांग किंवा शंभू महादेवाचे डोंगर. या महादेवरांगेच्या उत्तरेस नीरा नदीचे, तर दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे पसरलेले आहे. हि डोंगररांग सलगपणे पसरलेली नाही तर अनेक ठिकाणी खंडित झालेल्या स्वरुपात आहे. त्यामुळेच निरनिराळ्या भागांत ही डोंगरारांग वेगवेगळ्या नावांनी परिचित...

पावनगड

Image
दुर्लक्षित एकांडा पावनगड कथा किंवा कांदबरीमधून आपण जुळ्या भावांविषयी विषयी नेहमीच ऐकत असतो तशीच दुर्गविश्वातही काही जुळी भावंडे आढळतात. मग तो नाशिक जिल्यातील रवळ्या-जावळ्या असो, पुणे जिह्यातील लोहगड-विसापूर असो किंवा मग पुरंदर-वज्रगड. या जोड किल्ल्यांप्रमाणेंच कोल्हापूर जिल्ह्यांतील पन्हाळा-पावनगड ही दुर्गजोडी देखील इतिहासात प्रसिद्ध आहे. पन्हाळगड किल्ला माहित नाही असा दुर्गप्रेमी विरळाच. मराठ्यांच्या इतिहासातले अनेक महत्वाचे प्रसंग पन्हाळगडावर घडले त्यामुळे वर्षभर अनेक पर्यटक पन्हाळागडाला भेट देत असतात. मात्र त्याच्या शेजारीच असणाऱ्या पावनगडाला भेट देणाऱ्यांची संख्या अतिशय नगण्य आहे. पावनगड हा पन्हाळा किल्ल्याचाच एक भाग मानला गेल्याने कायम दुर्लक्षित राहिला. मात्र तो पन्हाळा किल्ल्याशेजारी असणारा एक स्वतंत्र जोडकिल्ला आहे. पन्हाळा किल्ला पूर्ण समजून घ्यावयाचा असेल, तर पावनगडाचे महत्त्व फार मोठे आहे. कारण पन्हाळा किल्ल्यावर जेव्हा जेव्हा आक्रमणे झाली तेव्हा त्याचे पहिले वार या पावनगडानेच झेलले आहेत. एप्रिल १७०१ मध्ये औरंगजेबाने पन्हाळा आणि त्याचा उपदुर्ग म्हणजे पावनगड जि...

मुडागड

Image
दाट जंगलात हरवलेला, अल्पपरिचित वनदुर्ग "मुडागड" उन्हाळा हा ट्रेकसाठी सामान्यतः निषिद्ध मानला जातो. याचे एक प्रमुख कारण म्हणजे ट्रेक करताना बसणारा उन्हाचा तडाखा तर दुसर कारण म्हणजे सह्याद्रीच्या कडेकपारीत असणारे आटत जाणारे पाण्याचे स्त्रोत. मग उन्हाळ्यात ट्रेक करायचेच नाहीत का? तर अगदी तसंही काही नाही. खास उन्हाळ्यात करता येतील असे काही ट्रेक आजही पश्‍चिम घाटाच्या समृद्ध वनसंपदेत शिल्लक आहेत ज्यांना वनदुर्ग म्हटले जाते. घनदाट निबीड अरण्यात सह्याद्रीच्या विराट माथ्यावर विराजमान झालेले किल्ले म्हणजे वनदुर्ग. वासोटा, प्रचितगड, भैरवगड (हेळवाक), जंगली जयगड हि अश्याच काही सह्याद्रीमधील सुप्रसिद्ध वनदुर्गांची नावे. काहीश्या अश्याच निबिड अरण्यात लपलेला आणि बहुतेक ट्रेकर्सना नावाने देखील माहित नसलेला एक वनदुर्ग म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यात येणारा "मुडागड". करवीर नगरी कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा, पावनगड, विशाळगड, मुडागड, गगनगड, शिवगड, रांगणा, भुदरगड, सामानगड, गंधर्वगड, कलानिधीगड, महिपालगड, पारगड असे तब्बल १३ किल्ले येतात. यापैकी काही किल्ले त्...