Posts

गडभ्रमंती गोमंतकीय किल्ल्यांची - भाग १

Image
माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्या-कपाऱ्यां मधुन घट फ़ुटती दुधाचे||    माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या-फ़णसाची रास फ़ुली फ़ळांचे पाझर फ़ळी फ़ुलांचे सुवास||    माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी,  पाना-फ़ुलांची कुसर पशु-पक्ष्यांच्या किनारी||    माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या रे धारा||    माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा||    माझ्या गोव्याच्या भूमीत चाफ़ा पानाविण फ़ुले भोळा भाबडा शालीन भाव शब्दाविण बोले||    माझ्या गोव्याच्या भूमीत गडे साळीचा रे भात वाढी आईच्या मायेने सोन-केवड्याचा हात||    माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी आतिथ्याची, अगत्याची साऱ्या षडरसांची नांदी||    सर्व महाराष्ट्र ज्यांना 'आनंदयात्री' म्हणून ओळखतो असे कविवर्य बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर) यांची गोव्याचे यथार्थ वर्णन करणारी ही कविता. पण गोवा म्हटलं की आपल्या नजरे ...

महाडप्रांतीचे लिंबूटिंबू

Image
' कियौ रायगढ़ वास '  असे कवी  भूषण आपल्या एका काव्यात लिहतो.  शिव छत्रपतींची व रायगडाची थोरवी गाताना कवी भूषण म्हणतो,   दच्छिन के सब दृःग्ग जिती, दुग्ग सहाय विलास। सिव सेवक, सिव गढपति, कियौ रायगढ़ वास॥ तहाँ नृप राजधानी करी, जीति सकल तुरकान। शिव सरजा रचि दान में, किनौ सुजस जहान॥ देसनि देसनि ते गुनी आवत जाचन ताहि। तिनमें आयौ एक कवि भूषन कहियतु जाहि॥   दुर्गदुर्गेश्वर रायगड म्हणजे स्वराज्याच्या तख्ताची जागा. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केल्यावर युध्दशास्त्राच्या दृष्टीने तो बळकट करण्यासाठी रायगडाच्या चोहोबाजूंनी किल्ल्यांची साखळी तयार केली. त्यासाठी महाराजांनी मंगळगड, कावळा, मानगड, कोकणदिवा, लिंगाणा, सोनगड, चांभारगड, पन्हाळघर, दौलतगड यासारखे काही दुर्ग उभारले तर काही जुने दुरुस्त करून स्वराज्यात सामील केले. याला रायगडाची दुर्गप्रभावळ किंवा दुर्गसमूह अथवा इंग्रजीत Cluster of forts असं म्हणता येईल. ही दुर्गप्रभावळ म्हणजे शिवाजी महाराजांच्या कल्पक बुद्धीने आखलेली एक अफाट व्युहरचना. यामुळे रायगडावर हो...