Posts

महाडप्रांतीचे लिंबूटिंबू

Image
' कियौ रायगढ़ वास '  असे कवी  भूषण आपल्या एका काव्यात लिहतो.  शिव छत्रपतींची व रायगडाची थोरवी गाताना कवी भूषण म्हणतो,   दच्छिन के सब दृःग्ग जिती, दुग्ग सहाय विलास। सिव सेवक, सिव गढपति, कियौ रायगढ़ वास॥ तहाँ नृप राजधानी करी, जीति सकल तुरकान। शिव सरजा रचि दान में, किनौ सुजस जहान॥ देसनि देसनि ते गुनी आवत जाचन ताहि। तिनमें आयौ एक कवि भूषन कहियतु जाहि॥   दुर्गदुर्गेश्वर रायगड म्हणजे स्वराज्याच्या तख्ताची जागा. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केल्यावर युध्दशास्त्राच्या दृष्टीने तो बळकट करण्यासाठी रायगडाच्या चोहोबाजूंनी किल्ल्यांची साखळी तयार केली. त्यासाठी महाराजांनी मंगळगड, कावळा, मानगड, कोकणदिवा, लिंगाणा, सोनगड, चांभारगड, पन्हाळघर, दौलतगड यासारखे काही दुर्ग उभारले तर काही जुने दुरुस्त करून स्वराज्यात सामील केले. याला रायगडाची दुर्गप्रभावळ किंवा दुर्गसमूह अथवा इंग्रजीत Cluster of forts असं म्हणता येईल. ही दुर्गप्रभावळ म्हणजे शिवाजी महाराजांच्या कल्पक बुद्धीने आखलेली एक अफाट व्युहरचना. यामुळे रायगडावर हो...

रामदरणे किल्ला

Image
भटकंती रायगड जिल्ह्यातील अल्पपरिचित "रामदरणे" किल्ल्याची!     पावसाळ्यात गडभटकंती आणि तीही गर्दीची ठिकाण टाळून? सध्या किल्ल्यावर होणाऱ्या गर्दीचे (कुंभमेळ्याचे) फोटो पाहून हे थोडं अवघडच काम वाटायला लागलंय. पण बाहेर पडणारा संततधार पाऊस आणि निसर्गाने सगळीकडे पांघरलेली हिरवीगार चादर माझ्यासारख्या भटक्याला घरी बसू देईल तर शपथ. मग शोध सुरु झाला अल्पपरिचित आणि अनवट वाटांचा. पुण्यातून पहाटे निघून जवळपास आणि फक्त एका दिवसाची गडभटकंती करायची असं ठरवल्यावर मग पुणे, सातारा आणि रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या किल्ल्यांच्या नावाची उजळणी सुरु झाली. तसे या तिन्ही जिल्ह्यातले जवळपास सगळे परिचित आणि अल्पपरिचित किल्ले आधीच भटकून झालेले असल्याने किल्ला करायचा तर तो शक्यतो याआधी न बघितलेला करावा असे ठरवल्यामुळे मग घरात असलेली गडकिल्ल्यावरील पुस्तके धुंडाळणे सुरु झाले. शेवटी दुर्गअभ्यासक आणि लेखक श्री. सचिन जोशी यांच्या "रायगड जिल्ह्याचे दुर्गवैभव" ह्या पुस्तकात अलिबाग जवळचा "रामदरणे" नावाचा किल्ला सापडला. आता येथे किल्ला सापडला म्हणजे किल्ला "शोधला" किंवा ...