Posts

दुर्गभ्रमंती कोल्हापूराच्या चंदगड परिसराची - भाग १

Image
पूर्वनियोजन, प्रस्थान  आणि वल्लभगडाची भेट  “ट्रेकिंगच भूत आणि सह्याद्रीच वेड, एकदा का कुणाला लागलं कि मग ते स्वस्थ बसू देत नाही”. आता हे कुणी म्हणलंय ते माहित नाही पण ज्याने कुणी म्हणलंय ते अगदी खरं आहे म्हणजे माझ्याबाबतीत तरी अगदीच १००% सत्य. २०१६ च्या सप्टेंबर महिन्यात सायकलवरून पडण्याचे निमित्त झाले आणि गुढग्याला जबर दुखापत झाली. त्यानंतर जवळ जवळ तीन महिने गपगुमान घरातच बसून काढले. जातिवंत भटक्याला हि एक मोठी शिक्षाच. त्यातच डोंगरभटक्यांचा सुर्वणकाळ असणारे सप्टेंबर ते फेब्रुवारी हे सहा महिने किमान यावर्षी तरी ट्रेकिंग शिवायच काढावे लागणार याची खंत  देखील मनात होती. बरोबरच्या इतर सह्यमित्रांचे व्हाट्सएप्प ग्रुपवर रसाळ-सुमार-महीपत, रतनगड-कात्राबाई असे एक से बढकर एक ट्रेक्सचे नियोजन पाहून नुसती जळफळाट होत होती. शेवटी डिसेंबरच्या सुरवातीला या दुखापतीमधून हळू हळू बरा होऊ लागलो आणि डॉक्टरांकडून घराबाहेर पडण्याची मुभा मिळाली. “पुढचे अजून सहा महिने तरी ट्रेक्स करायचे नाहीत”, इति डॉक्टर. पण घरी बसेल तर तो भटक्या कसला. ट्रेकिंग नाही तर नाही मग दुधाची तहान ताकाव...

भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी - भाग ३

Image
भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी - भाग २ पासून पुढे .... आज जायचे होते रत्नागिरी शहराच्या दक्षिणेकडे म्हणजेच आंबोळगडापर्यंत स्वैर भटकायला. त्यामुळे आजच्या दिवसाची सुरवात देखील मुक्कामी हॉटेलवर भरपूर अल्पोपहार करून सकाळी ९.३० वाजता केली. रत्नागिरी-भाट्ये-पावस-पूर्णगड-कशेळी-आंबोळगड असा सुमारे ६० किलोमीटरचा समुद्रकिनाऱ्याजवळून जाणारा निसर्गरम्य रस्ता आणि या रस्त्यावरील काही निवडक ठिकाणे पहायची असे आजचे टार्गेट ठरवले होते.  आजच्या दिवसाची सुरवात देखील एखाद्या बीचवर छानसा वॉक घेऊन करावी असे ठरवून रत्नागिरी शहरापासून अगदीचं हाकेच्या अंतरावर असणाऱ्या भाट्ये बीचवर पोहोचलो. पण या भाट्येच्या समुद्रकिनाऱ्याने आमची पार निराशा केली. रत्नागिरी शहराच्या अगदीच जवळ असल्याने अनेक होम स्टे, रिसॉर्ट आणि हॉटेल्स यामुळे सदैव गजबजलेला असा हा भाट्ये बीच. साहजिकच आजूबाजूला असणाऱ्या गर्दीमुळे हा बीच बिसलेरीच्या रिकाम्या बाटल्या आणि अस्ताव्यस्त पडलेले प्लास्टिक यांनी भरलेला दिसला. ज्यांना भरपूर खायला मिळणारे आणि वॉटर स्पोर्ट्स सारख्या सुविधा उपलब्ध असणारे गजबजलेले बीच आवडतात त्यांच्यासाठी भाट...