चला सिक्कीम फिरुया - भाग ३

चला सिक्कीम फिरुया - भाग १ - सिक्कीम राज्याविषयी माहिती, पुर्वतयारी आणि भ्रमंतीचे नियोजन चला सिक्कीम फिरुया - भाग २ - प्रस्थान व उत्तर सिक्कीममधील लाचेन व गुरुडोंगमार सरोवरची भटकंती उत्तर सिक्कीमची भटकंती ==> लाचुंग, झिरो पॉईंट, युमथांग व्हॅली व हॉट स्प्रिंग उत्तर सिक्कीममधील नितांत सुंदर लाचुंग गाव (फोटो इंटरनेट साभार) आज मंगळवार, २३ एप्रिल २०१९. आमच्या ट्रिपचा चौथा दिवस. "लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे" या धर्मशास्त्रात सांगितलेल्या नियमाचे आम्ही गेले दोन दिवस अगदी काटेकोरपणे पालन करत होतो. रात्री ९-९.३० वाजताच झोपायचो, त्यामुळे साहजिकच पहाटे ५-५.३० वाजता अलार्म वगैरे न लावताच जाग यायची. आजही प्रत्यक्षात पहाटे ५.३० वाजताचा गजर लावला असताना ५ वाजताच झोप पूर्ण झाल्यामुळे जाग आली. सहज म्हणून खिडकीचे पडदे बाजूला सारले तर बाहेर छान उजाडले होते. लाचुंग गावाला वेढा घातलेले बर्फाच्छादित डोंगर आणि त्यांच्या पडद्याआडून डोकावणारा सूर्यप्रकाश असं खूप सुंदर दृश खिडकीतून दिसत होतं. आजची सकाळ स्वच्छ सूर्यप्रकाश घेऊन उगवली...