Posts

Showing posts from 2023

विदर्भातील "प्रतापगड"

Image
विदर्भ आणि प्रतापगड? ऐकून थोडं चकीत झालात ना? कारण प्रतापगड म्हणलं की आपल्या नजरेसमोर येतो तो "महाबळेश्वरच्या जटांत आणि पारघाटाच्या ओठात" शिवाजी महाराजांनी बांधलेला आणि शिवप्रतापामुळे प्रसिद्ध पावलेला सातारा जिल्हयातील प्रतापगड. पण आपल्या याच महाराष्ट्रात पूर्व विदर्भाच्या अगदी टोकाला आणखी एक प्रतापगड नावाचा किल्ला आहे हे अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांना माहिती असावं. आज आपण गोंदिया जिल्हयातील याच प्रतापगडाची ओळख करून घेऊ.  महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यांची सीमा लाभलेला आणि बराचसा भाग वनांनी व्यापलेला असल्याने काहीसा दुर्गम असलेला जिल्हा म्हणजे "गोंदिया". या गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध व नवेगाव-नागझिरा राष्ट्रीय अभयारण्य प्रसिद्ध आहे. गोंदिया जिल्‍हयाच्‍या दक्षिणेस अर्जुनी मोरगांव तालुक्‍यात गोंदियापासून साधारण ७५ किमी तर तालुक्याच्या ठिकाणापासून केवळ १८ किमी अंतरावर प्रतापगड किल्ला आहे. नवेगाव बांधच्या अभयारण्यामधून एक डोंगररांग दक्षिणेकडे गेलेली आहे. याच डोंगररांगेवर घनदाट जंगलाचे सानिध्य लाभलेला प्रतापगड हा वनदुर्ग आ...