चला सिक्कीम फिरुया - भाग ४

चला सिक्कीम फिरुया - भाग १ - सिक्कीम राज्याविषयी माहिती, पुर्वतयारी आणि भ्रमंतीचे नियोजन चला सिक्कीम फिरुया - भाग २ - प्रस्थान व उत्तर सिक्कीममधील लाचेन व गुरुडोंगमार सरोवरची भटकंती चला सिक्कीम फिरुया - भाग ३ - उत्तर सिक्कीममधील लाचुंग, झिरो पॉईंट व युमथांग व्हॅलीची सफर गंगटोक शहराचे स्थलदर्शन ... आज बुधवार, २४ एप्रिल २०१९. आज सर्वजण बरेच रिलॅक्स होतो. याच कारण म्हणजे आजचा दिवस हा खास फक्त गंगटोक शहराच्या भटकंतीसाठी राखीव ठेवलेला होता. त्यामुळे आज फारसा प्रवास करायचा नव्हता. गंगटोक हे भारतातलं सर्वात स्वच्छ हिलस्टेशन म्हणून ओळखलं जातं. सिक्कीमची राजधानी असणारं हे शहर समुद्रसपाटीपासून तब्बल ५५०० फुटांवर वसलेलं एक फारच सुंदर ठिकाण आहे. स्थानिक लोक या शहराचा उच्चार गान्तोक किंवा गँटोक असा करतात. गँटोक म्हणजे डोंगराचं टोक किंवा डोंगरमाथा होय. गंगटोक हा शहरी भाग असला तरी पूर्ण डोंगरउतारावर वसलेलं हे शहर आहे. त्यामुळे इथं कुठेही जायचं झालं तरी अरुंद आणि वळणावळणाचा घाटरस्ता किंवा पायी जायचं झालं तरी पायऱ्या या ठरलेल्याच. उंच पर्वत...