चला सिक्कीम फिरुया - भाग १

सिक्कीम राज्याविषयी माहिती, पुर्वतयारी आणि आमच्या भ्रमंतीचे नियोजन ... “केल्याने देशाटन, मनुजा चातुर्य येतसे फार”, हे लहानपणी पुस्तकात वाचलेलं एक सुभाषित. आता प्रवास किंवा भटकंती केल्यामुळे चातुर्य येत का नाही ते माहित नाही पण प्रवासाचा अनुभव जीवन समृद्ध करतो हे मात्र खरं. आता तुम्हीच बघा, प्रवास केल्याने सृष्टीची रहस्ये कळतात. निसर्गात किंवा समाजात जे काही उदंड आहे ते समजतं. विविध लोकांशी संवाद साधता येतो. नुसतं पुस्तकात वाचण्यापेक्षा किंवा टीव्हीवर पाहण्यापेक्षा विविध ठिकाणच्या भाषा, भोजन, लोकांच राहणीमान, त्यांच्या चालीरीती, संस्कृति, इतिहास यांची प्रत्यक्ष ओळख होते. छोटे छोटे अनुभव तुमची समज वाढविण्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडतात. इतकेच नव्हे तर तुम्ही जेव्हा प्रवासासाठी बाहेर पडता तेव्हा जगाप्रती असलेला तुमचा दृष्टीकोन अधिक उत्क्रांत होतो. वर्षातून एकदा तरी, कोठे तरी पर्यटन केलं तर ताणतणावांना आपण जवळही फिरकू देणार नाही. म्हणूनच रामदास स्वामी देशाटनाचे महत्व विशद करताना लिहितात, 'सृष्टीमध्ये बहु लोक। परिभ्रमणे कळे कौतुक! चुकोनी उदंड आढळते।‘. सुदैवाने आम...