महाडप्रांतीचे लिंबूटिंबू

' कियौ रायगढ़ वास ' असे कवी भूषण आपल्या एका काव्यात लिहतो. शिव छत्रपतींची व रायगडाची थोरवी गाताना कवी भूषण म्हणतो, दच्छिन के सब दृःग्ग जिती, दुग्ग सहाय विलास। सिव सेवक, सिव गढपति, कियौ रायगढ़ वास॥ तहाँ नृप राजधानी करी, जीति सकल तुरकान। शिव सरजा रचि दान में, किनौ सुजस जहान॥ देसनि देसनि ते गुनी आवत जाचन ताहि। तिनमें आयौ एक कवि भूषन कहियतु जाहि॥ दुर्गदुर्गेश्वर रायगड म्हणजे स्वराज्याच्या तख्ताची जागा. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केल्यावर युध्दशास्त्राच्या दृष्टीने तो बळकट करण्यासाठी रायगडाच्या चोहोबाजूंनी किल्ल्यांची साखळी तयार केली. त्यासाठी महाराजांनी मंगळगड, कावळा, मानगड, कोकणदिवा, लिंगाणा, सोनगड, चांभारगड, पन्हाळघर, दौलतगड यासारखे काही दुर्ग उभारले तर काही जुने दुरुस्त करून स्वराज्यात सामील केले. याला रायगडाची दुर्गप्रभावळ किंवा दुर्गसमूह अथवा इंग्रजीत Cluster of forts असं म्हणता येईल. ही दुर्गप्रभावळ म्हणजे शिवाजी महाराजांच्या कल्पक बुद्धीने आखलेली एक अफाट व्युहरचना. यामुळे रायगडावर हो...