सफर कोस्टल कर्नाटकाची - भाग ३
सफर कोस्टल कर्नाटकाची - भाग २ पासून पुढे ... कर्नाटकातील अप्रतिम असा उंचाल्ली धबधबा आपण मागील दोन लेखांमधे केलेली कोस्टल कर्नाटकाची भटकंती ही अगदीच समुद्रकिनाऱ्याला लागून होती. पण आता यापुढील दोन भागात आपण समुद्रकिनाऱ्याची साथ सोडून मालेनाडूच्या पश्चिम घाटातील अरण्यमय डोंगराळ भागात प्रवेश करणार आहोत. मालेनाडू म्हणजे अरबी समुद्राला सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगांपासून वेगळा करणारा पूर्वेकडील डोंगर उतारांचा भाग. थोडक्यात सांगायचं तर कर्नाटकात पश्चिम घाटाचा प्रदेश हा मालेनाडू म्हणून ओळखला जातो. लांबीला अंदाजे १०० किमी पसरलेला हा प्रदेश मुख्यतः उत्तर कन्नड व दक्षिण कन्नड या दोन जिल्ह्यात येतो. हा भाग व्यापला आहे अंशी, अगुंबे, भद्रा, मुकांबिका, कुद्रेमुख यासारख्या घनदाट जंगलांनी. याच प्रदेशात कुद्रेमुख, मलयगिरी यांच्यासारखी उंचच उंच शिखर तर आहेतच पण त्यामधून वाहणारे जोग, मुगोड, उंचाल्ली सारखे मोठे मोठे जलप्रपात देखील आहेत. चला तर मग भटकंती करू या नवीन प्रदेशाची. दिवस पाचवा : गुरुवार, २६ ऑक्टोंबर २०१७ =============...