सफर कोस्टल कर्नाटकाची - भाग १

भगवान शंकरांचं अधिष्ठान, निसर्गसौंदर्याचं वरदान असलेला, इतिहासाचा वैभवशाली वारसा लाभलेला असा किनारी प्रदेश आणि या प्रदेशातील एक वैभवसंपन्न राज्य म्हणजेच कर्नाटक. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण सीमेला खेटून असणारे हे एक मोठे राज्य. हे राज्य देखील महाराष्ट्रासारखे विविधतेने नटलेले आहे. ऐतिहासिक सांस्कृतिक संपन्नता आणि निसर्ग वैभव येथे आपण अनुभवू शकतो. कर्नाटक राज्याला साधारण २८० किमीचा सागरकिनारा लाभलेला आहे जो महाराष्ट्राला लाभलेल्या किनारपट्टीच्या अर्ध्यापेक्षा ही कमी आहे. कर्नाटकाची हि सागरी किनारपट्टी कोस्टल कर्नाटक म्हणून ओळखली जाते. हि सागरी किनारपट्टी उत्तर कन्नड, उडपी व दक्षिण कन्नड अश्या तीन जिल्ह्यांमधे विभागली गेली आहे. थोडक्यात सांगायचं तर कोस्टल कर्नाटक म्हणजे या तीन जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची सफर. पण ही सफर फार अविस्मरणीय आहे. कारण यात आहेत प्रसिद्ध, प्रेक्षणीय आणि प्राचीन अशी मंदिर, स्वच्छ मुलायम मातीचे समुद्रकिनारे, हिरवीगार घनदाट जंगले, नारळी पोफळी सुपारीच्या बागा आणि या सगळ्यामधून धावणारा लाल मातीचा वळणावळणाचा रस्ता. गेली दोन वर्ष हि कोस्टल कर्नाटक...