Posts

Showing posts from October, 2017

पावसाळ्यातील स्वर्ग "कैलासगड"

Image
पुणे शहराच्या पश्चिमेकडे भोर, मुळशी, वेल्हा व मावळ असे सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमधे वसलेले काही तालुके आहेत. छत्रपती शिवरायांच्या कालखंडाचा ऐतिहासिक वारसा लाभलेले तालुके म्हणून जशी या तालुक्यांची ओळख आहे, तसेच निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेले तालुके म्हणूनही या तालुक्यांकडे पाहिले जाते. यातील पुणे शहराला सर्वांत जवळचा असणारा तालुका म्हणजे मुळशी.  खिंडीत पोहोचल्यानंतर दिसणारा कैलासगडाचा डोंगर एका बाजूला उंचच उंच डोंगरकडे, तर दुसऱ्या बाजूला काळजाचा ठाव घेणाऱ्या खोल दऱ्या, पावसाळ्यात कोकणाच्या बरोबरीने पडणारा धो-धो पाऊस, कडय़ाकपारीतून वाहणारे धबधबे, या सर्वांमुळे पुणेकरांचे आवडते विकेंड डेस्टीनेशन असणारा ताम्हीणी घाट याच मुळशी तालुक्यातून कोकणात उतरतो. ट्रेकर्सना साद घालणारी देवकुंड, प्लस व्हॅली, घनगड, तैलबैला, अंधारबन अशी आवडती ट्रेकिंगची ठिकाणे देखील याच मुळशी तालुक्यातली. पण हि गर्दीची ठिकाणे टाळून जर का ट्रेकिंगची आणि पावसाळ्यातील निसर्गाची खरी मजा लुटायची असेल तर मुळशी तालुक्यातील कैलासगडाला भेट देणे क्रमप्राप्त आहे.  पावसाळ्यात कैलासगडावरून पाहायला मिळणारा...